Bappi Lahiri Dies at 69: बॉलिवूडला पॉप म्युझिकचं वेड लावणारे गायक,संगीतकार बप्पी लहरी यांचे निधन
या काळात त्यांनी चलते चलते, डिस्को डांसर, शराबी सारख्या सिनेमांना हीट गाणी दिली.
बॉलिवूड मध्ये आपल्या मधाळ आवाजाने आणि अनोख्या अंदाजाने छाप पाडलेले गायक संगीतकार बप्पी लहरी (Bappi Lahiri ) यांचे मुंबईत निधन झाले आहे. मीडीया रिपोर्ट्सनुसार त्यांच्या मुंबई च्या Criti Care Hospital मध्ये उपचारादरम्यान मंगळवार (15 फेब्रुवारी) रात्री उशिरा मृत्यू झाला आहे. ते 69 वर्षांचे होते. बप्पी लहरी किंवा बप्पी दा म्हणून त्यांची रसिकांना ओळख असली तरीही अलोकेश लहिरी हे त्यांचं खरं नाव आहे.
बप्पी लहरी यांचे निधन विविध आरोग्याच्या समस्येमुळे झाले आहे. त्यांच्यावर डॉ. Deepak Namjoshi उपचार करत होते. त्यांच्यामाहितीनुसार मागील महिन्यात बप्पी लहरी यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. उपचारानंतर त्यांना सोमवारी डिस्चार्ज देण्यात आला पण मंगळवारी पुन्हा त्यांची प्रकृती खालावली. कुटुंबियांनी डॉक्टरांना होम विझिट साठी बोलावले पण खालावत असलेल्या प्रकृतीमुळे त्यांना पुन्हा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. त्यांचं निधन obstructive sleep apnea मुळे झाल्याचं डॉ. नामजोशी यांनी म्हटलं आहे.
बॉलिवूड मध्ये 'डिस्को', 'Pop' म्युझिकचा समावेश करण्यात आणि त्याला प्रसिद्ध करण्यात बप्पी लहरी यांचा मोलाचा वाटा होता. सोबतच त्यांच्या अंगावरील सोनं हा देखील त्यांच्या लूकचा एक अविभाज्य भाग राहिल्याने त्यांचीदेखील कायम चर्चा होत असे. अनेक रिएलिटी शो मध्ये त्यांनी जज च्या भूमिकेत राहून उमद्या कलाकारांना, गायक, संगीतकारांना मार्गदर्शन केले आहे.
बप्पी लहरी यांची कारकीर्द ही बॉलिवूड मध्ये 1970-80 च्या काळातील आहे. या काळात त्यांनी चलते चलते, डिस्को डांसर, शराबी सारख्या सिनेमांना हीट गाणी दिली. 2020 मध्ये आलेल्या बागी 3 या सिनेमातील भंकस हे त्यांचं बॉलिवूड मधील शेवटचं गाणं ठरलं आहे. नक्की वाचा: Luckee Movie Poster & Song : जितेंद्रच्या स्टाईलमध्ये अभय महाजन म्हणतोय 'शोधू जरा कोपचा', वैशाली सामंत सोबत Bappi Lahiri पहिल्यांदा मराठीत!
मागील वर्षी बप्पी लहरी यांना कोविडची लागण झाली होती त्यानंतर त्यांनी या आजरावरही मात केली होती. त्यानंतर त्यांचा आवाज गेल्याच्या अफवा पसरल्या होत्या पण त्यांनी त्या खोट्या ठरवल्या.