Ayodhya Verdict: 'अयोध्या निकालाचा भारतीय म्हणून स्विकार करा', बॉलिवूड कलाकार स्वरा भास्कर, अनुपम खेर यांच्यासह बी-टाउनचे नागरिकांना शांततेचे आवाहन

वादग्रस्त भाग रामलल्लांचा तर अयोद्धेत मशिदीसाठी 5 एकर जागा दिली जाणार असल्याचा सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे.

Swara Bhaskar and Anupam Kher (Photo Credits-Twitter)

अयोध्या रामजन्मभूमी वादग्रस्त जमीन प्रकरणी आज (9 नोव्हेंबर) महत्वपूर्ण निर्णयाची घोषणा करण्यात आली. वादग्रस्त भाग रामलल्लांचा तर अयोद्धेत मशिदीसाठी 5 एकर जागा दिली जाणार असल्याचा सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. यासाठी सरकारला एक ट्रस्ट स्थापन करून माहिती कोर्टासमोर सादर करण्याची आहे.त्यामुळे अयोध्याबाबत जो काही निर्णय कोर्टाकडून देण्यात आला आहे त्याचा स्विकार करावा असे नेतेमंडळींसह बॉलिवूड कलाकारांनी आवाहन नागरिकांना केले आहे. याच पार्श्वभूमीवर बॉलिवूड कलाकार स्वरा भास्कर हिने ट्वीट करत नागरिकांना शांती आणि सुसंवाद राखावा असे आवाहन केले आहे. तसेच स्वराने आपल्या भावना व्यक्त करत भजनाच्या दोन ओळी लिहिल्या आहेत.

स्वराने ट्वीट मध्ये असे लिहिले आहे की, "रघुपति राघव राजा राम.. सब को सन्मति दे भगवान।" या भजनाचा अर्थ म्हणजे ईश्वर सर्वांना सुबुद्धि देवो. हे भजन जगाला अहिंसेचा धडा शिकणारे राष्ट्ररपिता महात्मा गांधी यांचे आवडते भजन होते.

तसेच बॉलिवूड मधील दिग्गज अभिनेता अनुप खेर यांनी ट्वीट करत लोकांना शांती कायम ठेवण्याचे आवाहन केले आहे. अनुपम खेर यांनी पुढे "अल्लाह तेरो नाम, ईश्वर तेरो नाम। सबको सम्मति दे भगवान।" असे ही ट्वीट मध्ये लिहिले आहे.(Ayodhya Judgement: सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचा आदर मात्र आम्हांला अपेक्षित निकाल आला नाही: मुस्लिम पक्षकार)

B-Town Celebrity Tweet: 

मात्र अनुपम खेर यांनी ट्वीट केल्यानंतर नेटकऱ्यांनी त्याचा विरोध केला आहे. सरकारच्या विरोधात अनुपम खेर कधीच बोलत नही असा आरोप लगावला आहे. तर अनुपम खेर यांनी नरेंद्र मोदी यांनी अयोध्या प्रकरणी निर्णय जाहीर केल्यानंतर करण्यात आलेले ट्वीट रिट्वीट केले आहे. त्यामध्ये नागरिकांना शांति आणि संयम बाळण्याचे अपील करण्यात आले आहे.