Ashoke Pandit Files Complaint Against Netizen: आजारपणाबद्दल खोट्या बातम्या पसरवणाऱ्या नेटिझनविरोधात अशोक पंडित यांनी दाखल केली तक्रार
चित्रपट निर्मात्याने नेटिझन विरोधात तक्रार दाखल केली असून आपण तंदुरुस्त आणि निरोगी असल्याचे स्पष्ट करण्यासाठी एक व्हिडिओ शेअर केला आहे. अशोक पंडित हे इंडियन फिल्म अँड टेलिव्हिजन डायरेक्टर्स असोसिएशनचे अध्यक्ष म्हणून काम करतात.
Ashoke Pandit Files Complaint Against Netizen: आजारपणाबद्दल खोट्या बातम्या पसरवणाऱ्या नेटिझनविरोधात चित्रपट निर्माते अशोक पंडित (Ashoke Pandit) यांनी तक्रार दाखल केली आहे. या यूजर्सने चित्रपट निर्मात्याला दोन दिवसांपूर्वी हृदयविकाराचा झटका आला होता आणि 72 हुरैन चित्रपटाच्या अपयशानंतर ते निराश झाले होते, अशी पोस्ट केली होती. चित्रपट निर्मात्याने नेटिझन विरोधात तक्रार दाखल केली असून आपण तंदुरुस्त आणि निरोगी असल्याचे स्पष्ट करण्यासाठी एक व्हिडिओ शेअर केला आहे. अशोक पंडित हे इंडियन फिल्म अँड टेलिव्हिजन डायरेक्टर्स असोसिएशनचे अध्यक्ष म्हणून काम करतात.
फ्री प्रेस जर्नलने अशोक पंडित यांच्याशी संपर्क साधला. अशोक पंडित यांनी यावर प्रतिक्रिया देताना म्हटलं आहे की, हे खूप दुःखद आहे. लोकांना अशा गोष्टींमधून समाधान मिळते. मी देवाला प्रार्थना करेन की त्यांना खूप संवेदनशीलता आणि चांगले आरोग्य लाभो. मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुंबई पोलिसांकडे तक्रार केली असून या व्यक्तीला तत्काळ अटक करावी, अशी मागणीही केली आहे. (हेही वाचा -Akshay Kumar New Movie: खिलाडी अक्षय कुमारने केली नव्या सिनेमाची घोषणा, टीझर रिलीज (Watch Teaser)
चित्रपट निर्मात्याने त्याच्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवर वापरकर्त्याच्या पोस्टचा स्क्रीनशॉट देखील शेअर केला आहे. या पोस्टमध्ये त्यांनी म्हटलं आहे की, @mieknathshinde @devendra_fadnavis @mumbaipolice मी तुम्हाला विनंती करतो की माझ्याबद्दल खोटी अफवा पसरवणाऱ्या आणि माझ्या शुभचिंतकांमध्ये दहशत निर्माण करणाऱ्या या व्यक्तीवर गंभीर कारवाई करावी. तो समाजासाठी धोका असून त्याला तुरुंगात टाकले पाहिजे.
तथापी, दिग्दर्शक हंसल मेहता यांनीही ट्विटरवर या वापरकर्त्याला फटकारले आहे. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे की, तुमचे त्यांच्याशी मतभेद असू शकतात. त्याच्याकडे दुर्लक्ष करा. पण ही अफवा पसरवणे थांबवा. अशोक पंडित हे दयाळू आणि मनमिळाऊ आहेत. कोणाच्याही आरोग्याबाबत असे ओंगळवाणेपणा पसरवणे चुकीचे आहे.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)