
Akshay Kumar New Movie: गांधी जयंती निमित्त अक्षय कुमारने सोशल मीडियावर आगामी चित्रपटाची घोषणा केली आहे. टीझर रिलीज करत या आगामी चित्रपटाची तारीख देखील घोषित केली आहे. बॉलिवुडचा खिलाडी अभिनेता अक्षय कुमारने सोशल मीडियावर 'स्काय फ्रोर्स' चित्रपटाची घोषणा केली आहे. पुढच्या वर्षी गांधी जयंती निमित्त हा चित्रपट प्रेक्षकांना चित्रपटगृहात पाहायला मिळणार आहे. इन्स्टाग्रामर टीझर शेअर केला आहे. टीझर मध्ये दिसल्या प्रमाणे हा चित्रपट भारतातील पहिल्या हवाई युध्दा संदर्भात आहे. खिलाडी हा नेहमीच वेगवेगळ्या भुमिकेतून प्रेक्षकांचे मनोरंजन करत असतो.
अक्षय कुमार हवाई दलातील अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहे. टीझर शेअर करत अभिनेत्याने लिहिलं आहे,"आज गांधी आणि शास्त्री जयंतीनिमित्त संपूर्ण देश जय जवान, जय किसान, जय विज्ञान, जय अनुसंधानच्या घोषणा देत आहे.नेटकऱ्यांनी देखील पोस्टर पाहून चांगली प्रतिक्रिया दिली आहे. स्काय फोर्स' या सिनेमाचं दिग्दर्शन अभिषेक कपूर आणि संदीप केवलानी यांनी केलं आहे.
View this post on Instagram
जिओ स्टुडिओ अंतर्गत खिलाडीचा हा चित्रपट निर्मीती करण्यात आला आहे. या सिनेमासह 'मिशन रानीगंज', आणि हेराफेरी ३ चित्रपटासाठी चर्चेत आहे.