मुंबई: 'खान माझ्या आवडत्या कलाकारांपैकी एक'; प्रसिद्ध कलाकार रणजित दहिया यांनी आपल्या घराच्या भितींवर रेखाटले अभिनेता इरफान खान यांचे छायाचित्र

इरफान खान यांनी वयाच्या 54 व्या वर्षी मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. इरफान खान यांला न्यूरोएन्डोक्राइन ट्यूमर नावाचा आजार होता.

बॉलिवूड अभिनेता इरफान (Irrfan Khan) खान यांचे निधन झाले आहे. इरफान खान यांनी वयाच्या 54 व्या वर्षी मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. इरफान खान यांला न्यूरोएन्डोक्राइन ट्यूमर नावाचा आजार होता. परंतु, 28 एप्रिल रोजी त्यांची अचानक प्रकृती बिघडल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी 29 एप्रिल रोजी त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या निधनाने संपूर्ण बॉलिवूडसह सर्वत्र शोककळा पसरली आहे. राजकीय क्षेत्रातून देखील त्यांच्या निधनानंतर भावूक प्रतिक्रिया येत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, कॉंग्रेस नेते राहुल गांधी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह दिग्गज नेत्यांनी इरफान खान यांना श्रद्धांजली अर्पण केली. मात्र, प्रसिद्ध कलाकार रणजित दहिया (Ranjit Dahiya) यांनी इफरान खान यांना अनोख्या पद्धतीने श्रद्धांजली वाहली आहे. तसेच इरफान खान हे आपल्या आवडत्या कलांकारांपैकी एक होते, असेही ते म्हणाले आहे.

रणजित दहिया यांनी मुंबईतील (Mumbai) वांद्रे (Bandra) येथील आपल्या घराच्या भिंतीवर अभिनेता इनफान यांचे छायाचित्र रेखाटले आहे. तसेच इरफान खान हा माझ्या आवडत्या कलाकरांपैकी एक होता, असे म्हणत त्यांना श्रद्धांजली वाहली आहे. यामुळे सर्वांचे लक्ष दहिया यांनी काढलेल्या छायाचित्राकडे वेधले आहे. हे देखील वाचा- मजूरांना घरी जाण्यासाठी मोफत रेल्वे सेवा देण्यात यावी: बॉलिवुड अभिनेता रितेश देशमुखने शेअर केला मन हेलावून टाकणार फोटो

एएनआयचे ट्वीट-

बॉलिवूड अभिनेता इरफान खानने मार्च 2018 मध्ये आपल्याला कॅन्सर झाला असल्याचे जाहीर केले होते. यानंतर त्याने सर्व कामे थांबवली होती. त्यानंतर इमरान खान उपचारासाठी लंडनला निगून गेला होता. इरफान खानने कॅन्सरवर मात केली असून उपचारानंतर सप्टेंबर 2019 मध्ये लंडनहून भारतात परतला होता. मात्र, आज सकाळी अचानक त्याची प्रकृती खालावल्यामुळे त्याला मुंबई येथील कोकिळा बेन रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतु, 29 एप्रिल रोजी उपचार दरम्यान इरफान खानचा मृत्यू झाला.