AR Rahman Daughters Engagement: ए.आर. रहमानची मुलगी Khatija Rahman चा झाला साखरपुडा; जाणून घ्या कोण आहे संगीतकाराचा होणारा जावई

खतिजाने तमिळ चित्रपटांमध्ये काही गाणी गायली आहेत

Khatija Rahman (संग्रहित संपादित प्रतिमा)

हिजाबमुळे वादाच्या भोवऱ्यात सापडलेली संगीतकार-गायक एआर रहमान (AR Rahman) यांची मुलगी खतिजा रहमान (Khatija Rahman) हिची एंगेजमेंट झाली आहे. खुद्द खतिजाने ही बातमी तिच्या सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. ज्यामध्ये तिने तिच्या फोटोसोबत होणाऱ्या नवऱ्याचा फोटोही शेअर केला आहे. हा साखरपुडा 29 डिसेंबर रोजी झाला परंतु खतिजाने नवीन वर्षात 4 दिवसांनंतर फोटो शेअर केला आहे. खतिजाचा साखरपुडा रियासदीन शेख मोहम्मदसोबत झाला आहे, जो व्यवसायाने ऑडिओ इंजिनियर आहे.

खतिजा हिच्या वाढदिवसाच्या दिवशीच तिची एंगेजमेंट झाली होती. आता चाहत्यांसह आनंदाचे क्षण शेअर करताना खतिजा लिहिते, ‘देवाच्या आशीर्वादाने, उद्योजक आणि ऑडिओ अभियंता रियासदीन शेख मोहम्मद याच्याशी माझ्या साखरपुड्याची घोषणा करताना आनंद होत आहे. 29 डिसेंबरला माझ्या वाढदिवसादिवशी आमचा साखरपुडा झाला, ज्यामध्ये कुटुंबीय आणि जवळचे लोक सहभागी झाले होते.’ फोटोमध्ये खतिजा गुलाबी रंगाच्या पोशाखात दिसत आहे. यामध्ये तिने कपड्यांशी जुळणारा डिझायनर मास्कही घातला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by 786 Khatija Rahman (@khatija.rahman)

खतिजा अनेकदा तिच्या ड्रेसमुळे चर्चेत असते. दोन वर्षांपूर्वी 'स्लम डॉग मिलेनियर' चित्रपटाला 10 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात रहमानची मुलगी उपस्थित राहिली होती. यामध्ये ती स्टेजवर पूर्णपणे बुरखा घालून बोलताना दिसली, ज्यामुळे तिला सोशल मीडियावर ट्रोल केले गेले होते. लेखिका तस्लिमा नसरीननेही खतिजाला तिच्या हिजाबसाठी ट्रोल केले होते. तस्लिमा नसरीन म्हणाल्या होत्या की, जेव्हा मी सुशिक्षित लोकांना बुरख्यात पाहते तेव्हा माझा जीव गुदमरतो. लेखिकेच्या म्हणण्याला उत्तर देताना खतिजा म्हणाली होती की, तिला तिने केलेल्या निवडीबद्दल अजिबात पश्चात्ताप नाही.’ (हेही वाचा: Vicky Kaushal: इंदौरमध्ये 'विकी कौशल' विरोधात तक्रार दाखल, जाणुन घ्या काय आहे प्रकरण?)

दरम्यान, ए आर रहमान आणि त्यांची पत्नी सायरा बानो यांना खतिजा, रहीमा आणि एआर अमीन अशी तीन मुले आहेत. खतिजाने तमिळ चित्रपटांमध्ये काही गाणी गायली आहेत. तिने रजनीकांतच्या एन्थिरनच्या पुडिया मनिधा गाण्याने गायनात पदार्पण केले.