Vicky Kaushal: इंदौरमध्ये 'विकी कौशल' विरोधात तक्रार दाखल, जाणुन घ्या काय आहे प्रकरण?
माझ्या परवानगीशिवाय ते माझी नंबर प्लेट वापरू शकत नाहीत. पोलिस ठाण्यात निवेदन दिले आहे. याप्रकरणी त्यांच्यावर कारवाई करावी.
इंदौरमधील (Indore) एका व्यक्तीने विकी कौशल (Vicky Kaushal) विरोधात तक्रार दाखल केली आहे. या व्यक्तीचा दावा आहे की विकीने चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी बाईक वापरली आहे आणि त्या बाईकची नंबर प्लेट त्याची आहे. विकी आणि सारा अली खानचे (Sara Ali Khan) सेटवरील फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर ही तक्रार नोंदवण्यात आली आहे. एएनआयच्या (ANI) वृत्तानुसार, तक्रारदाराने सांगितले की, "फिल्ममधील एका क्रमात बाइकवर वापरलेली नंबर प्लेट माझी आहे. चित्रपटाच्या युनिटला याबद्दल माहिती आहे की नाही हे मला माहीत नाही, पण हे बेकायदेशीर आहे. माझ्या परवानगीशिवाय ते माझी नंबर प्लेट वापरू शकत नाहीत. पोलिस ठाण्यात निवेदन दिले आहे. याप्रकरणी त्यांच्यावर कारवाई करावी.
Tweet
Vehicle number used in the movie sequence is mine; don't know if the film unit is aware of it...This is illegal, can't use my number plate without permission. I have given a memorandum at the station. Action should be taken in the matter: Complainant Jai Singh Yadav (1.1.22) pic.twitter.com/CkpZBVUndu
— ANI (@ANI) January 1, 2022
याप्रकरणी उपनिरीक्षक म्हणाले, आमच्याकडे तक्रार आली आहे. नंबर प्लेटचा वापर बेकायदेशीरपणे झाला आहे की नाही हे आम्ही पाहतो. जर प्रत्यक्षात नंबर प्लेटचा गैरवापर झाला असेल, तर मोटार वाहन कायद्यानुसार कारवाई करू. (हे ही वाचा Kangana Ranaut: नवीन वर्षात कंगणाची देवाकडे प्रार्थना, म्हणाली – मला यावर्षी कमी FIR आणि जास्त प्रेमपत्रे हवी आहेत.)
View this post on Instagram
आगामी 'लुका छुप्पी 2' चित्रपटाचे चित्रीकरण मध्य प्रदेशात सुरू आहे. या चित्रपटामध्ये अभिनेता विकी कौशल आणि अभिनेता सारा अली खान झळकणार आहेत. या चित्रपटाचे चित्रीकरण मध्य प्रदेशातील इंदौरमध्ये सुरु आहे तसेच आता या प्रकरणात काय होते आणि चित्रपट किंवा अभिनेत्यावर काय कारवाई होईल ते लवकरच समजेल.
या चित्रपटाशिवाय विकी दिग्दर्शक शशांक खेतान यांच्या गोविंदा नाम मेरा या चित्रपटातही दिसणार आहे. त्याचवेळी कतरिना कैफ तिच्या आगामी 'हॅपी न्यू इयर' या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात करणार आहे.
(The above story first appeared on LatestLY on Jan 02, 2022 04:46 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

