Anushka Sharma On RCB Win: अनुष्का शर्मा हिने आपल्या गरोदरपणाचा उल्लेख करत रॉयल चॅलेंजर्स बंगळूरू च्या विजयावर दिली 'ही' प्रतिक्रिया, पाहा पोस्ट

या पोस्टमध्ये अनुष्काने म्हटले आहे की, 'हा सामना एका गरोदर महिलेसाठी फारच रोमांचक होता.' त्याच्या पुढे तिने हार्ट इमोजी सुद्धा टाकले आहेत.

Anushka Sharma (Photo Credits: @IPL)

RCB vs MI 10th IPL Match 2020: IPL ची कालची (28 सप्टेंबर) रॉयल चॅलेंजर्स बंगळूरू(Royal Challengers Bangalore) विरुद्ध मुंबई इंडियन्स (Mumbai Indians)झालेला सामना हा खूपच रोमहर्षक होता. RCB या सामन्यात दणदणीत विजय मिळवत MI चा पराभव केला. यावर RCB चा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) याची पत्नी अनुष्का शर्मा (Anushka Sharma) हिने या विजयावर तितकीच दणदणीत आणि हटके प्रतिक्रिया दिली आहे. कारण हा सामना तितकाच रोमहर्षक आणि अगदी अंगावर काटा आणणारा होता. अनुष्का शर्मा ही गरोदर असल्याने आपल्यासाठी हा सामना रोमांचक होता अशी प्रतिक्रिया अनुष्काने इन्स्टाग्राम स्टोरीवर फोटो शेअर करुन दिली आहे.

या पोस्टमध्ये अनुष्काने म्हटले आहे की, 'हा सामना एका गरोदर महिलेसाठी फारच रोमांचक होता.' त्याच्या पुढे तिने हार्ट इमोजी सुद्धा टाकले आहेत. IPL 2020: KXIP vs RCB सामन्यात विराट कोहली आणि अनुष्का शर्मा वर सुनील गावस्कर यांनी केलेल्या टिप्पणीवरुन नेटकरी भडकले (See Posts)

Anushka Sharma Post on RCB (Photo Credits: Instagram)

अलीकडेच ज्येष्ठ माजी क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांनी विराट कोहलीच्या मॅचमधील प्रदर्शनाबद्दल बोलताना त्याची पत्नी अनुष्का शर्मा हिचा उल्लेख केला होता. त्यामुळे सोशल मिडियावर त्यांच्यावर अनेकांनी टिका केली तर त्यांच्या समर्थकांनी त्यांना पाठिंबा दिला. यावरुन अनुष्काने देखील सोशल मिडियाच्या माध्यमातून टिका करत नाराजी व्यक्त केली. तुमचे विराटच्या सामन्यातील खेळाबद्दलची प्रतिक्रिया माझ्या नावाशिवाय पूर्ण होणार नव्हती का असा सवाल अनुष्काने सुनील गावस्कर यांना विचारला होता.