Virushka 3rd Wedding Anniversary: अनुष्का शर्माने नव्या पाहुण्याचा उल्लेख करत पती विराट कोहलीला लग्नाच्या वाढदिवसाच्या दिल्या हटके शुभेच्छा
अनुष्काने आपल्या ऑफिशियल इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक गोंडस फोटो शेअर करत पती विराटला हटके मेसेज दिला. अनुष्काने लिहिले की, "आपली तीन वर्ष आणि लवकरच आपण तीन होऊ.. मिस यू."
Virushka 3rd Wedding Anniversary: बॉलीवुड अभिनेत्री अनुष्का शर्मा (Anushka Sharma) आणि टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) यांच्या लग्नाचा आज तिसरा वाढदिवस आहे. या खास दिवस विराट आणि अनुष्का एकमेकांसोबत नाही. विराट ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर कसोटी मालिकेसाठी सज्ज होत आहे तर अनुष्का मुंबईच्या आपल्या घरी आहे. मात्र, दोघांनी सोशल मीडियाद्वारे एकमेकांना लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. विराटने दोघांच्या लग्नातील एक फोटो शेअर केला, तर अनुष्काने आपल्या ऑफिशियल इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक गोंडस फोटो शेअर करत पती विराटला हटके मेसेज दिला. अनुष्काने लिहिले की, "आपली तीन वर्ष आणि लवकरच आपण तीन होऊ.. मिस यू." अनुष्काने शेअर केलेला फोटो यूजर्सना चांगलाच पसंत पडत आहे. दरम्यान, अनुष्का शर्मा आणि विराटच्या घरी जानेवारी महिन्यात पाळणा हलणार असून बॉलीवूड अभिनेत्री अनेकदा आपला बेबी बंप फ्लॉन्ट करताना दिसली. (Virat Kohli-Anushka Sharma Wedding Anniversary: लग्नाच्या तिसऱ्या वाढदिवशी विराटने अनुष्काला दिल्या 'या' खास शुभेच्छा, शेअर केला सुंदर Photo)
दुसरीकडे, ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असलेल्या विराटने शेअर केलेला फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. विराटने लग्नाचा न पाहिलेला फोटो पोस्ट केला आहे. 2017 रोजी इटलीमध्ये या जोडप्याने राजेशाही थाटात लग्नगाठ बांधली. इटलीमध्ये जवळचे मित्र आणि काही नातलगांच्या उपस्थितीत दोंघांचे लग्न झाले. लग्नापूर्वी दोघं चार वर्ष डेट करत होते. शिवाय, यंदा आयपीएलसाठी युएईमध्ये असताना दोघांनी सोशल मीडिया अकाउंटवर ते आई-बाबा होणार असल्याची बातमी शेअर केली होती.
विराट सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असून तो पहिला कसोटी सामना खेळून मायदेशी रवाना होणार आहे. पहिल्या बाळाच्या आगमनासाठी विराटची पॅटर्निटी रजा बीसीसीआयने मंजूर केली असून तो ती संपूर्ण सुट्टी अनुष्का आणि आपल्या बाळासोबत घालवणार आहे. 17 ते 21 डिसेंबर दरम्यान ऑस्ट्रेलिया-भारत दरम्यान अॅडिलेडमध्ये पहिली टेस्ट खेळली जाणार आहे.