Ankita Lokhande ने पिवळ्या रंगाच्या साडीत बॉलिवूड अभिनेत्री माधुरी दीक्षितच्या 'धक-धक करने लगा' गाण्यावर केला जबरदस्त डान्स; See Viral Video
माधुरी दीक्षितच्या या सुपरहिट गाण्यावर अंकिताच्या डान्स मूव्हजने सर्वांना चकित केले आहे.
अभिनेत्री अंकिता लोखंडे (Ankita Lokhande) सोशल मीडियावर खूपचं असते. अंकिता अनेकदा आपले व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. अंकिता लोखंडेला डान्स करण्याची खूप आवड आहे, हे तिच्या चाहत्यांना चांगलेचं ठाऊक आहे. अंकिताच्या डान्स मूव्हस चाहत्यांना खूपचं आवडतात. तिचे डान्स व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतात. आता अंकिता लोखंडेने पुन्हा एकदा तिचा डान्स व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.
अंकिता लोखंडेने बॉलिवूड अभिनेत्री माधुरी दीक्षितच्या ब्लॉकबस्टर डान्स 'धक-धक करने लगा' ची कॉपी केली आहे. माधुरी दीक्षितच्या या सुपरहिट गाण्यावर अंकिताच्या डान्स मूव्हजने सर्वांना चकित केले आहे. अंकिताच्या या व्हिडिओने सोशल मीडियावर खळबळ उडवून दिली आहे. व्हिडिओमध्ये अंकिता लोखंडे यलो शिफॉन साडीमध्ये दिसत आहे. हा व्हिडिओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओवर चाहत्यांनी आपल्या प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत. (वाचा - Glacier Breaks in Uttarakhand: उत्तराखंडमध्ये जोशीमठात हिमकडा कोसळल्यानंतर सोनू सूद, दीया मिर्झा, श्रद्धा कपूर आदी कलाकारांनी व्यक्त केलं दु:ख)
यापूर्वी अंकिता लोखंडेने इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला होता. ज्यामध्ये ती शाहरुख खानच्या गाण्यावर डान्स करताना दिसली होती. अंकिताने शाहरुख आणि दीपिका पादुकोण स्टारर फिल्म चेन्नई एक्सप्रेसच्या सुपरहिट गाण्यावर डान्स केला होता. हा डान्स चाहत्यांना खूपचं आवडला होता.
अभिनेता सुशांतसिंग राजपूत यांच्या निधनानंतर अंकिता लोखंडेने त्याला न्याय मिळवून देण्यासाठी खास मोहिम राबवली होती. अंकिता सुशांतची एक्स गर्लफ्रेंड आहे. सुशांतच्या निधनानंतर अंकिता लोखंडेने एका पुरस्कार सोहळ्यादरम्यान दिवंगत अभिनेत्याला डान्सद्वारे श्रद्धांजली दिली होती. अंकिता लोखंडेच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल सांगायचे तर ती सध्या विक्की जैनशी डेट करत आहे. अंकिता आणि विक्की लवकरचं लग्न करणार असल्याची बातमी आहे. तथापि, अद्याप याबाबत कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.