Ankita Lokhande थिरकली 'नाच मेरी लैला' गाण्यावर, व्हिडिओमध्ये केल्या फनी मूव्हस, Watch Video
हे गाणे ती किती एन्जॉय करतेय हे तुम्हाला तिच्या चेह-यावरील आनंद पाहूनच होईल.
अनेक हिंदी मालिकांमधून तसेच चित्रपटातून समोर आलेली अभिनेत्री अंकिता लोखंडे (Ankita Lokhande) हिचे सोशल मिडियावर फोटोज आणि व्हिडिओज शेअर करत असते. दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत याची एक्स गर्लफ्रेंड असलेली अंकिता गेल्या काही दिवसांपासून तिच्या विधानांमुळे प्रचंड चर्चेत होती. यानंतर अलीकडे तिचा आणि तिच्या बॉयफ्रेंडचा डान्स व्हिडिओ देखील व्हायरल झाला होता. मात्र आता तिचा एक नवा व्हिडिओ डान्स व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये अंकिता टोनी कक्कड़ च्या 'नाच मेरी लैला की धून' (Naach Meri Laila ki Dhun) या गाण्यावर नाचताना दिसत आहे.
या व्हिडिओमध्ये अंकिताने छान फनी मूव्ह्स केल्या आहेत. हे गाणे ती किती एन्जॉय करतेय हे तुम्हाला तिच्या चेह-यावरील आनंद पाहूनच होईल.हेदेखील वाचा- Ankita Lokhande झी रिश्ते पुरस्कार सोहळ्यात सुशांत सिंह राजपूत साठी करणार खास डान्स परफॉर्मन्स, व्हिडिओ पोस्ट करत दिली माहिती
अंकिता काळ्या रंगाचा एक छान गाऊन घातला असून त्यावर ती हा मजेशीर डान्स करताना दिसत आहे. तिचा हा डान्स पाहून कोणालाही थिरकावेसे वाटेल.
अलीकडे तिने झी रिश्ते पुरस्कार (Zee Rishtey Award 2020) सोहळ्यासाठी तयारी करतानाचा व्हिडिओ शेअर केला होता. यात तिने सुशांतच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी खास नृत्याचा सराव करताना दिसली होती.
दरम्यान अंकिताची ज्येष्ठ अभिनेत्री उषा नाडकर्णी यांच्यासोबत भेट झाली होती. उषाताईंनी 'पवित्र रिश्ता’मध्ये सुशांतसिंह राजपूत याच्या आईची भूमिका साकारली होती. सुशांतच्या मृत्यूनंतर प्रतिक्रिया देताना, आपल्या फार मोठा धक्का बसल्याचे उषा नाडकर्णी यांनी सांगितले होते. या भेटीत या दोघींनी सुशांतच्या आठवणींना उजाळा दिला.