Sidhu Moose Wala Murder Case: दिल्ली पोलिसांना मोठ यश; सिद्धू मुसेवालावर गोळी झाडणारा शूटर अंकित सिरसा याला अटक
अंकित हा सिद्धू मुसेवालाच्या हत्येमध्ये सहभागी असलेल्या शूटरपैकी एक आहे. त्याच्यावर राजस्थानमध्ये खुनाच्या प्रयत्नाचे आणखी दोन गुन्हे दाखल आहेत.
Sidhu Moose Wala Murder Case: पंजाबी गायक सिद्धू मूसेवाला (Sidhu Moose Wala) च्या हत्येप्रकरणी दिल्ली पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेल/एनडीआर च्या पथकाने लॉरेन्स बिश्नोई-गोल्डी ब्रार टोळीतील (Bishnoi-Goldy Brar Alliance) दोन मोस्ट वॉन्टेड गुन्हेगारांना अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या गुन्हेगाराचे नाव अंकित सिरसा (Ankit Sirsa) आहे. अंकित हा सिद्धू मुसेवालाच्या हत्येमध्ये सहभागी असलेल्या शूटरपैकी एक आहे. त्याच्यावर राजस्थानमध्ये खुनाच्या प्रयत्नाचे आणखी दोन गुन्हे दाखल आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांनी त्यांच्याकडून पंजाब पोलिसांचे तीन गणवेश, एक 9 एमएम पिस्तूल, एक 3 एमएम पिस्तूल आणि डोंगल्ससह दोन मोबाईल जप्त केले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अंकित सिरसा याने सिद्धूवर गोळीबार केला. प्रियव्रत फौजीसोबत अंकित त्याच्या कारमध्ये उपस्थित होता. सुरुवातीला अंकित आणि फौजी दोघेही एकत्र पळून गेले होते. पोलिसांनी प्रियव्रतला यापूर्वीच अटक केली आहे. (हेही वाचा - Kishor Das Passed Away: अभिनेता किशोर दास ने वयाच्या 30 व्या वर्षी घेतला जगाचा निरोप; 'या' गंभीर आजाराने झाले निधन)
दरम्यान, हे दोन्ही आरोपी हरियाणाचे रहिवासी असून काल रात्री 11 वाजेनंतर दिल्लीच्या काश्मिरी गेट बसस्थानकाजवळून पोलिसांनी त्यांना पकडले. पंजाब पोलिसांनी बुधवारी सिद्धू मूसेवालाच्या हत्येप्रकरणी गँगस्टर जगदीप भगवानपुरियाला अटक केली होती.
एएनआय या वृत्तसंस्थेनुसार, दिल्लीच्या पटियाला हाऊस कोर्टाने भगवानपुरियाचा पंजाब पोलिसांना एक दिवसाचा ट्रान्झिट रिमांड मंजूर केला आहे. मूसवालाच्या हत्येप्रकरणी गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई याला अमृतसर कोर्टात हजर करण्यात आल्यानंतर त्याच्या पोलिस कोठडीत 8 दिवसांची वाढ करण्यात आली आहे. पंजाबमधील मानसा जिल्ह्यातील जवाहरके गावात 29 मे रोजी सिद्धू मूसेवाला यांची अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या झाडून हत्या केली होती.