Anant-Radhika Engagement: अनंत अंबानी-राधिका मर्चंटची आज होणार एंगेजमेंट; अँटिलियामध्ये पार पडणार सोहळा

राजस्थानमधील राजसमंद जिल्ह्यातील नाथद्वारा येथे असलेल्या श्रीनाथजी मंदिरात रोक्याचा कार्यक्रम झाला. मात्र, अनंत आणि राधिकाचे लग्न कधी होणार, याची माहिती अद्याप स्पष्ट झालेली नाही.

Anant-Radhika Engagement Photo (PC - Instagram/@pinkvilla)

Anant-Radhika Engagement: रिलायन्स इंडस्ट्रीजचे मालक मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी (Anant Ambani) आणि राधिका मर्चंट (Radhika Merchant) यांची आज संध्याकाळी एंगेजमेंट होणार आहे. मुकेश अंबानी यांच्या मुंबईतील निवासस्थानी हा कार्यक्रम होणार असल्याचे सांगण्यात आले आहे. यापूर्वी 29 डिसेंबरला अनंत अंबानी आणि राधिकाचा रोका पार पडला होता. त्यानंतर या जोडप्याच्या रोका सोहळ्यातील फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. राजस्थानमधील राजसमंद जिल्ह्यातील नाथद्वारा येथे असलेल्या श्रीनाथजी मंदिरात रोक्याचा हा कार्यक्रम झाला. मात्र, अनंत आणि राधिकाचे लग्न कधी होणार, याची माहिती अद्याप स्पष्ट झालेली नाही.

अनंत आणि राधिका एकमेकांना खूप दिवसांपासून ओळखतात. अंबानी कुटुंबाच्या प्रत्येक कार्यक्रमात राधिकाची उपस्थित असते. राधिका मर्चंट ही एन्कोर हेल्थकेअरचे सीईओ वीरेन मर्चंट आणि शैला मर्चंट यांची मुलगी आहे. राधिकाचे वडील वीरेन यांचीही गणना देशातील श्रीमंत व्यक्तींमध्ये केली जाते. राधिकाचे शालेय शिक्षण मुंबईत झाले आहे. यानंतर ती अभ्यासासाठी न्यूयॉर्कला गेली. तेथे त्यांनी राजकारण आणि अर्थशास्त्राचा अभ्यास केला. 2017 मध्ये ग्रॅज्युएशन पूर्ण केल्यानंतर, राधिका सेल्स एक्झिक्युटिव्ह म्हणून रुजू झाली. तिला वाचन, ट्रॅकिंग आणि पोहण्याची आवड आहे. (हेही वाचा -Maharashtra Economic Advisory Council: महाराष्ट्राच्या आर्थिक सल्लागार समितीमध्ये Anant Ambani व Karan Adani यांचा समावेश)

मुकेश अंबानी यांचा मुलगा अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट लहानपणापासून एकमेकांना ओळखतात. 2018 मध्ये दोघांचा एकत्र फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. राधिका एक प्रशिक्षित शास्त्रीय नृत्यांगना देखील आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement