Amrita Rao Baby Boy Name: अमृता राव-आरजे अनमोल आपल्या बाळाची झलक दाखवत सांगितले काय ठेवले मुलाचे नाव
त्यांच्या चाहत्यांना ज्या गोष्टीची आतुरता लागली होती त्याबद्दलची उत्सुकता संपवत अमृता-अनमोल ने आपल्या बाळाचे नाव चाहत्यांना सांगितले आहे.
बॉलिवूडची अभिनेत्री अमृता राव (Amrita Rao) हिने रविवारी एका गोंडस मुलाला जन्म दिला. अमृता काही दिवसांपूर्वीच ती गरोदर असल्याची माहिती चाहत्यांना सोशल मिडियाच्या माध्यमातून दिली होती. रविवारी अमृता राव-आरजे अनमोल (Amrita-RJ Anmol) माता पिता झाले ही बातमी कळताच चाहत्यांसह सिनेसृष्टीतील अनेक कलाकारांनी त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला. नुकताच अमृता आणि अनमोल ने आपल्या बाळाची पहिली झलक दाखवत आपल्या मुलाचे नाव काय ठेवले या संदर्भात इन्स्टाग्रामवर पोस्ट केले. त्यांच्या चाहत्यांना ज्या गोष्टीची आतुरता लागली होती त्याबद्दलची उत्सुकता संपवत अमृता-अनमोल ने आपल्या बाळाचे नाव चाहत्यांना सांगितले आहे.
अमृता-अनमोल ने आपल्या बाळाचे नाव 'वीर' (Veer) ठेवले असून 'हेलो वर्ल्ड, भेटा आमच्या मुलाला 'वीर' ला' असे कॅप्शन दिले. या पोस्ट मध्ये या दोघांनी आपल्या बाळाच्या नाजूक हाताचा फोटो शेअर केला आहे. हेदेखील वाचा- Amrita Rao Blessed With A Baby Boy: अमृता राव आणि आरजे अनमोल च्या घरी चिमुकल्याचे आगमन, गोंडस मुलाला दिला जन्म
या फोटोत या दोघांनी वीर चा हात पकडला आहे. आरजे अनमोल ने आपल्या मुलासाठी नाव सुचविण्याचे चाहत्यांना सांगितले होते. त्यावर त्यांना अनेक नावे सांगण्यात आली. त्यातून त्यांनी आपल्या मुलाचे नाव वीर ठेवण्याचे ठरवले.
अमृताने विवाह, मैं हू ना, मस्ती, सत्याग्रह यांसारखे अनेक हिट चित्रपटात काम केले आहे. अमृता आणि अनमोलने 2016 मध्ये लग्न केलं. त्यापूर्वी जवळपास 7 वर्ष ते एकमेकांना डेट करत होते. त्यानंतर त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या लग्नातही अगदी जवळचे लोक आणि कुटुंबातील मित्र दिसले होते.