Amol Palekar Comeback: अमोल पालेकर यांचे '200 Halla Ho' द्वारे चित्रपटसृष्टीत 12 वर्षांनी पुनरागमन; Rinku Rajguru दिसणार हटके भूमिकेत
'200 Halla Ho' चित्रपटात अमोल पालेकर, बरुन सोबती (Barun Sobti), रिंकू राजगुरु (Rinku Rajguru), साहिल खट्टर (Sahil Khattar), सलोनी बत्रा (aloni Batra), इंद्रनील सेनगुप्ता (Indranil Sengupta) आणि उपेंद्र लिमये (Upendra Limaye) अशी तगडी स्टारकास्ट या सिनेमात पाहायला मिळणार आहे.
अमोल पालेकर (Amol Palekar) हे जवळपास 12 वर्षांनी पुन्हा एकदा चित्रपटसृष्टीत पुनरागमन करत आहेत. यशस्वी अभिनेते आणि लोकप्रीय दिग्दर्शक अशी त्यांची ओळख आहे. '200-हल्ला हो' (200 Halla Ho) चित्रपटाच्या माध्यमातून ते कमबॅक करत आहेत. अमोल पालेकर, बरुन सोबती (Barun Sobti), रिंकू राजगुरु (Rinku Rajguru), साहिल खट्टर (Sahil Khattar), सलोनी बत्रा (aloni Batra), इंद्रनील सेनगुप्ता (Indranil Sengupta) आणि उपेंद्र लिमये (Upendra Limaye) अशी तगडी स्टारकास्ट या सिनेमात पाहायला मिळणार आहे.
पुनरागमन करताना अमोल पालेकर यांनी म्हटले आहे की, हिदी सिनेमामध्ये जातीचा मुद्दा केव्हातरीच पाहायला मिळतो. कारण तो पारंपरीत दृष्ट्या मनोरंजनाचा मुद्दा नाही. '200-हल्ला हो' हा चित्रपट एका दलित महिलेच्या वास्तव कथेवरती आधारीत आहे. जिने एका बलात्काऱ्यावर न्यायालयात हल्ला केला होता. सार्धक दासगुप्ता यांनी दिग्दर्शीत केलेली आणि दासगुप्ता आणि गौरव शर्मा यांच्याद्वारा सहलिखीत हा चित्रपट 200 दलित महिलांच्या नजरेतून लैंगिक हिंसाचार, जातीवाचक छळ, भ्रष्टाचार आणि बेकायदेशीर गोष्टी अशा विविध मुद्द्यांना स्पर्श करतो.
अमोल पालेकर यांनी अभिन केलेले 1970 च्या दशकातील 'रजनीगंधा', 'चितचोर', 'छोटी सी बात', 'गोल माल' यांसारखे चित्रपट विशेष गाजले होते. अमोल पालेकर यांनी विद्यमान चित्रपटांविषयी बोलताना म्हटले की, प्रामुख्याने अनेकदा निर्माता दिग्दर्शक अस्वस्थ करणारे विषय हाताळायला कचरतात. '200-हल्ला हो' चित्रपटात असाच अस्वस्त करणारा विषय हाताळण्यात आला आहे. जो भारतीय चित्रपटांमध्ये विशेषत्वाने हाताळला गेला नाही. (हेही वाचा, Amol Palekar Birthday: उत्कृष्ट दिग्दर्शक आणि अभिनेता असलेल्या अमोल पालेकर यांनी 'या' चित्रपटातून मराठी सिनेसृष्टीत केले पदार्पण, Watch Video)
मराठी आणि तामिळ सिनेमांमध्ये अनेकदा जातीचा मुद्दा यशश्वीरित्या उचलण्यात आला आहे. नागराज मंजुळे यांच्या 'फॅन्ड्री' आणि 'सैराट' यांसारख्या आणि पा रंजीत यांच्या 'काला' आणि 'सरपट्टा परंबरई' यांसारख्या चित्रपटात जातीचा मुद्दा अधिक प्रभावीपणे हाताळण्यात आला आहे. नीरज घेवान यांच्या 'मसान' आणि 'गीली पुच्ची' यांसारख्या काही चित्रपटांची नावे वगळता मुख्य प्रवाहातील हिंदी चित्रपटांमध्ये जातीचा मुद्दा मोठ्या प्रमाणावर अदृश्यच राहतो. नेटफ्लिक्सवर आलेल्या 'अजीब दास्तां' चित्रपात जातीचा विषय विशेष हाताळल्याचे पाहायला मिळते.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)