Big Breaking: अमिताभ बच्चन यांच्यानंतर बॉलिवूड अभिनेता अभिषेक बच्चनलादेखील कोरोना विषाणूची लागण

अभिषेकने आपल्या ट्विटर हँडलवरून यासंदर्भात माहिती दिली आहे.

Abhishek Bachchan (Photo Credits: Twitter)

काही वेळापूर्वीच महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांना कोरोनाची (Coronavirus) लागण झाल्याचं स्पष्ट झाल असतानाचं त्यांचा पुत्र अभिनेता अभिषेक बच्चनलादेखील (Abhishek Bachchan) कोरोना व्हायरसची बाधा झाली असल्याचं समजत आहे. अभिषेकने आपल्या ट्विटर हँडलवरून यासंदर्भात माहिती दिली आहे.

अभिषेकने केलेल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे की, 'आज माझी आणि माझ्या वडिलांची म्हणजेच महानायक अमिताभ बच्चन यांची करोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. आम्हा दोघांनाही करोनाची सौम्य लक्षणं आहेत. त्यामुळे आम्ही रुग्णालयात दाखल झालो आहोत. आम्ही आमच्या संपूर्ण स्टाफला विनंती केली आहे, की त्यांनी त्यांची कोरोना चाचणी करुन घ्यावी. तसंच आमच्या कुटुंबीयांनीदेखील कोरोना चाचणी करावी. सगळ्यांना शांत राहण्याचं आवाहनही मी करतो, असंदेखील अभिषेकने ट्विटमध्ये म्हटलं आहे. (हेहा वाचा - बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह; ट्विटरवर दिली माहिती)

दरम्यान, अमिताभ बच्चन यांनी काही वेळापूर्वीचं त्यांना कोरोनाचा संसर्ग झालाचं सांगितलं होतं. त्यामुळे त्यांना मुंबईतील नानावाटी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. या घटनेनंतर सोशल मीडियावर अमिताभ बच्चन आणि अभिषेक बच्चन यांच्या चाहत्यांनी त्यांच्या प्रकृतीसाठी प्रार्थना केली आहे.