अमिताभ बच्चन यांची भूमिका असलेला आणि नागराज मंजुळे दिग्दर्शित 'झुंड' चित्रपटचे प्रदर्शन थांबवण्यासाठी खटला दाखल; 28 मे ला होणार सुनावणी
या खटल्यावर 28 मे ला सुनावणी होणार आहे. हे प्रकरण हैदराबादचे चित्रपट निर्माते नंदी चिन्नी कुमार (Nandi Chinni Kumar) यांनी तेलंगणाच्या रंगा रेड्डी जिल्ह्यातील मियापूर येथील अतिरिक्त जिल्हा न्यायालयात दाखल केले आहे. त्यांनी झुंड चित्रपटात कॉपीराइटचे उल्लंघन केल्याचा आरोप केला आहे.
नागराज मंजुळे (Nagraj Manjule) दिग्दर्शित आणि अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांची भूमिका असलेल्या 'झुंड' (Jhund) चित्रपटचे प्रदर्शन थांबवण्यासाठी याचिका दाखल करण्यात आली आहे. या खटल्यावर 28 मे ला सुनावणी होणार आहे. हे प्रकरण हैदराबादचे चित्रपट निर्माते नंदी चिन्नी कुमार (Nandi Chinni Kumar) यांनी तेलंगणाच्या रंगा रेड्डी जिल्ह्यातील मियापूर येथील अतिरिक्त जिल्हा न्यायालयात दाखल केले आहे. त्यांनी झुंड चित्रपटात कॉपीराइटचे उल्लंघन केल्याचा आरोप केला आहे.
‘सैराट’ हा सुपरडुपर हिट मराठी चित्रपट देणारे नागराज मंजुळे ‘झुंड’ या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहेत. ‘झुंड’ हा त्यांचा पहिला हिंदी चित्रपट आहे. अमिताभ बच्चन या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. (हेही वाचा - विलासराव देशमुख यांच्या जयंती निमित्त मुलगा रितेश ने वडिलांच्या पोशाखासह केले असे काही जे पाहून डोळ्यांच्या कडा ओलावतील, पाहा भावूक व्हिडिओ)
'झुंड' हा चित्रपट एनजीओ 'स्लम सॉकर फाउंडेशन' चे संस्थापक आणि प्रशिक्षक विजय बारसे यांच्या जीवनावर आधारित आहे. विजय यांनी झोपडपट्ट्यातील मुलांना फुटबॉल खेळण्यास प्रोत्साहित केले होते. तसेच विजय बारसे हे अखिलेश पॉल यांचेदेखील प्रशिक्षक होते. (वाचा - Vilasrao Deshmukh Jayanti 2020: सरपंच ते मुख्यमंत्री पुढे केंद्रात मंत्री राहिलेल्या दिवंगत विलासराव देशमुख यांचा थक्क करणारा जीवन प्रवास)
नंदी कुमार यांच्या दाव्यानुसार, विजय बारसे यांचा बायोपीक अखिलेश पॉल यांच्याशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. 2017 मध्ये नंदी कुमार यांनी ‘स्लम सॉकर’ खिलाडी अखिलेश पॉलच्या जीवनावर आधारित चित्रपट काढण्यासाठी हक्क विकत घेतले. त्यानंतर कुमार यांनी ‘स्लम सॉकर’ या चित्रपटाची योजना आखली. अखिलेश पॉल हा नागपूरच्या झोपडपट्टी भागात राहणारा व्यसनी मुलगा असतो. त्याला फुटबॉलची आवड असते. फुटबॉलची ही आवड त्याचे संपूर्ण आयुष्य बदलते.
दरम्यान, 11 जून 2018 रोजी नंदी चिन्नी कुमार यांनी तेलंगणा सिनेमा रायटर असोसिएशनकडे या चित्रपटाच्या कथेची अधिकृतरित्या नोंद केली. परंतु, दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी अखिलेश पॉल यांना प्रशिक्षण देणारे विजय बारसे यांच्या जीवनावर आधारित चित्रपटाचे हक्क विकत घेतले. या चित्रपटात विजय बारसेसह अखिलेश पॉलचा जीवन प्रवास दाखवण्यात येणार आहे. म्हणून कुमार यांनी नागराज मंजुळे आणि चित्रटातील काही व्यक्तींवर कॉपीराईट कायद्याचे उल्लंघन केल्याचा आरोप करत न्यायालयात धाव घेतली. येत्या 28 मे ला या प्रकरणावर सुनावणी होणार आहे.