Amitabh Bachchan यांनी विना हेल्मेट प्रवासावर जारी केला खुलासा; पहा त्या बाईकस्वारी मागील सत्य काय?

अमिताभ बच्चन यांनी आपल्याला ट्राफिक नियमांची पूर्ण कल्पना आहे. आपला कोणताही उद्देश या नियमांचं उल्लंघन करण्याचा नसल्याचं म्हटलं आहे.

Amitabh Bachchan यांनी विना हेल्मेट प्रवासावर जारी केला खुलासा; पहा त्या बाईकस्वारी मागील सत्य काय?
Big B । Instagram

बॉलिवूडचे शहेनशाह म्हणून ओळख असलेल्या अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांचे मागील काही दिवसात सोशल मीडीयात बाईक वा विना हेल्मेट बसलेले फोटो पहायला मिळाले आहेत. दरम्यान यावरून अनेक नेटकर्‍यांनी बीग बी अमिताभ बच्चन यांना ट्राफिकचे नियम दाखवून ट्रोल देखील केले आहे. मागील 2 दिवसांच्या या चर्चांवर आता अखेर बीग बी अमिताभ बच्चन यांनी आपला खुलासा दिला आहे. सोशल मीडीया मध्ये वायरल झालेले फोटोज हे शूटिंगचा भाग होता. त्यासाठी दक्षिण मुंबई मध्ये बलार्ड पिअर भागात पोलिसांकडून परवानगी घेण्यात आल्याचं त्यानी जारी केलेल्या खुलाशामध्ये म्हटलं आहे.

अमिताभ बच्चन यांनी आपल्याला ट्राफिक नियमांची पूर्ण कल्पना आहे. आपला कोणताही उद्देश या नियमांचं उल्लंघन करण्याचा नसल्याचं म्हटलं आहे. शुटिंगच्या ठिकाणी केवळ 30-40 जण उपस्थित होते. पोलिसांनी रहदारीचा मार्ग बंद ठेवला होता. तसेच हे शूटिंग रविवारी करण्यात आले होते. रविवार हा सुट्टीचा दिवस असल्याने कार्यालयं बंद होती आणि लोकांची वर्दळ देखील कमी होती. Mumbai Traffic Police On Anushka Sharma: अनुष्का शर्मा हिचा विनाहेल्मेट प्रवास, मुंबई पोलिसांनी उगारला कायद्याचा बडगा, आकारला दंड; घ्या जाणू

अमिताभ बच्चन यांनी खुलाशात लिहल्यानुसार, 'पण हो, वक्तशीरपणाची समस्या असती तर मी बाईकस्वारी नक्कीच केली असती. मी हेल्मेट घालून आणि रहदारीचे सर्व नियम पाळले असते. हे करणारा मी एकटा नाही. वेळेवर लोकेशनवर पोहोचण्यासाठी अक्षय कुमार हे करताना दिसला आहे. अमिताभ बच्चन यांनी ब्लॉगच्या शेवटी लिहिले की, तुमची काळजी, काळजी, प्रेम आणि ट्रोलिंगबद्दल धन्यवाद. . Amitabh Bachchan Gets Stuck In Traffic: 'बिग बी' अमिताभ बच्चन ट्रॅफीकमध्ये अडकले, चाहत्याकडून लिफ्ट घेत शुटींगला पोहोचले .

 

View this post on Instagram

 

A post shared by Amitabh Bachchan (@amitabhbachchan)

अमिताभ बच्चन सध्या Project K,मध्ये दिसणार आहेत. त्यांच्यासोबत अभिनेत्री Deepika Padukone आणि अभिनेता प्रभास झळकणार आहे. Project K हा सिनेमा हिंदी आणि तेलगू भाषेमध्ये केला जाणार आहे. बिग बी Ribhu Dasgupta यांच्या कोर्टरूम ड्रामा Section 84 मध्येही दिसणार आहेत.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)



Share Us