Amitabh Bachchan Birthday: अमिताभ बच्चन यांच्या 'या' काही डायलॉग्समुळे Big B यांना म्हटले जाते 'Angry Young Man'

अमिताभ बच्चन यांचे हे वय ऐकून थोडा धक्काच बसेल पण त्यांची एनर्जी आणि काम करण्याचा उत्साह हा भल्याभल्यांना प्रेरणा देणारा आहे.

Amitabh Bachchan (Photo Credits: Instagram)

Amitabh Bachchan Birthday:  बॉलिवूड मधील बिग बी  (Big B) म्हणजेच अमिताभ बच्चन आज 78 वा वाढदिवस साजरा करणार आहेत. अमिताभ बच्चन यांचे हे वय ऐकून थोडा धक्काच बसेल पण त्यांची एनर्जी आणि काम करण्याचा उत्साह हा भल्याभल्यांना प्रेरणा देणारा आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वी अमिताभ बच्चन यांना कोरोनाची लागण झाली होती. पण या कोरोनावर ही अमिताभ बच्चन यांनी यशस्वी मात करत केबीसी 12 च्या सेटवर शूटिंग करताना दिसून आले. अमिताभ बच्चन एखादा टीव्ही चॅनलवरील कार्यक्रम असो किंवा चित्रपटाचे शूटिंग करत असतील त्यावेळी त्यांचा जोश पाहण्याजोगा असतो.(बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन शोधत आहेत दुसरा जॉब; कारण घ्या जाणून)

अमिताभ बच्चन यांचे करोडोंच्या संख्येने चाहते आहेत. तर बच्चन यांचे सिनेमे सुद्धा आजही आवर्जुन पाहिले जातात. ऐवढेच नाही बच्चन यांच्या चित्रपटातील गाजलेली गाणी असो वा एखादा डायलॉग हा आपण कोणाच्या ना कोणाच्या तोंडातून ऐकतोच. तर अमिताभ बच्चन 78 व्या वाढदिवसानिमित्त 'या' काही डायलॉग्समुळे Big B यांना म्हटले जाते 'Angry Young Man'. (अमिताभ बच्चन आणि अभिषेक बच्चन यांची कोरोनातून सुटका व्हावी यासाठी उज्जैन येथे पूजेचे आयोजन, पहा फोटो)

>शराबी– मूंछें हों तो नत्थूलाल जैसी हो वरना ना हो

>>अग्निपथ– पूरा नाम, विजय दीनानाथ चौहान, बाप का नाम दीनानाथ चौहान, मां का नाम, सुहासिनी चौहान, गांव मांडवा, उम्र छत्तीखस साल

>>शहंशाह– रिश्ते में तो हम तुम्हारे बाप होते हैं, मगर नाम है शहंशाह

>>डॉन – डॉन को पकड़ना मुश्किल ही नहीं ना मुमकिन है

>>दिवार- मैं आज भाी फेंके हुए पैसे नहीं उठाता

>>लावारिश- अगर अपनी मां का दूध पिया है तो सामने आ

दरम्यान, अमिताभ यांनी आपल्या कारकीर्दीत अनेक पुरस्कार प्राप्त केले आहेत. यामध्ये दादासाहेब फाळके पुरस्कार, तीन राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार आणि बारा फिल्मफेअर पुरस्कारांचा समावेश आहे. सर्वोत्कृष्ट अभिनेता फिल्मफेअर पुरस्काराचा विक्रम त्याच्या नावावर आहे. अभिनय व्यतिरिक्त बच्चन यांनीपार्श्वगायक, चित्रपट निर्माता, टीव्ही प्रस्तुतकर्ता आणि 1984 ते 1987 दरम्यान भारतीय संसदेचे निवडलेले सदस्य म्हणून भूमिका निभावली आहेत. सध्या ते लोकप्रिय टीव्ही शो ‘कौन बनेगा करोडपती’चे सूत्रसंचालन ही करताना दिसून येतात.