Coronavirus Lockdown मध्ये सलमान खान घोड्यांसोबत एन्जॉय करतोय ब्रेकफास्ट; पहा त्याचा अजब अंदाज (Watch Video)

आज इंस्टाग्राम अकाऊंटवर घोड्याला चारा भरवताना 'Breakfast with my love...' अशा कॅप्शनसह एक खास व्हिडीओ पोस्ट केला आहे.

Salman Khan | Photo Credits: Instagram

महाराष्ट्रासह देशभरात सध्या कोरोना व्हायरसचा विळखा दिवसागणिक घट्ट होत आहे. अशामध्ये सर्वसामान्यांसोबतच बॉलिवूड सेलिब्रिटी घरीच राहून लॉकडाऊनचं काटेकोर पालन करत आहेत. कुणी घरकाम करत, कुणी फॅमिली टाईम एंजॉय करतंय पण बॉलिवूडचा दबंगस्टार सलमान खान पनवेलच्या फार्महाऊसमध्ये आपला वेळ घालवत आहे. आज सलमान खानने फार्म हाऊसमधील घोड्यांसोबत घालवलेले काही क्षण इंस्टाग्रामच्या माध्यमातून चाहत्यांसोबत शेअर केले आहेत. आज इंस्टाग्राम अकाऊंटवर घोड्याला चारा भरवताना 'Breakfast with my love...' अशा कॅप्शनसह एक खास व्हिडीओ पोस्ट केला आहे. सलमान खान त्याच्या बेफिकीर, बिनधास्त अंदाजासाठी ओळखला जातो. त्याने आज शेअर केलेल्या व्हीडिओमध्येही त्याचा असाच अंदाज पहायला मिळाल. सलमान खानने घोड्याला भरवलेल्या चार्‍याचा स्वतःही आस्वाद घेतला.

दरम्यान देशात लॉकडाऊन आहे आणि त्याचं कठोर पालन केलंच पाहिजे असे आवाहन त्याने भारतीयांना केलं आहे. मुंबई नजिक पनवेल जवळ असलेल्या फार्म हाऊसवर काही आठवड्यांपूर्वी सलमान त्याच्या कुटुंबातील काही सदस्यांसोबत आला आहे. काही दिवसांपूर्वी त्याचा पुतण्या निर्वाणसोबत पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये 'आपण कोरोनाला घाबरलो आहोत... मागील 3 आठवड्यांपासून आम्ही वडिलांना भेटलो नाही. कारण आम्ही संचारबंदीच्या नियामांचं पालन करत आहोत.' असं म्हटलं आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार सलमान खान व्हिडीओ कॉलच्या माध्यमातून वडील सलिम खान यांच्यासोबत संपर्कात आहे. Coronavirus संकटकाळात मदतीसाठी धावला सलमान खान; 25 हजार कामगारांसाठी आर्थिक मदत घोषित.

सलमान खानचा खास व्हिडिओ

 

View this post on Instagram

 

Breakfast with my love...

A post shared by Salman Khan (@beingsalmankhan) on

मुंबईपासून लांब असला तरीही सलमान खानने सामाजिक भान जपत बॉलिवूडमध्ये बॅकस्टेज काम करणार्‍या अनेक मजूरांना लॉकडाऊनच्या या कठीण काळामध्ये मदतीचा हात पुढे केला आहे. या लोकांच्या बॅंक अकाऊंटमध्ये काही विशिष्ट रक्कम त्याने दिली आहे. यामुळे अनेकांना तात्पुरता आर्थिक आधार मिळाला आहे. सध्या लॉकडाऊन असल्याने सिनेक्षेत्रातही सिनेमा रिलीज, शुटिंग बंद करण्यात आले आहे.