Akshay Kumar याचा Bell Bottom होणार सिनेमागृहात प्रदर्शित, खिलाडीने केली घोषणा

तरीही अभिनेता अक्षय कुमार (Akshay Kumar) याने आपला नवा आगामी सिनेमा बेल बॉटमची प्रदर्शित होण्याची तारीख घोषित केली आहे.

अक्षय कुमार (Photo Credits: Instagram)

कोरोना व्हायरसमुळे देशात अद्याप सिनेमागृह पूर्णपणे उघडण्यास परवानगी देण्यात आलेली नाही. तरीही अभिनेता अक्षय कुमार (Akshay Kumar) याने आपला नवा आगामी सिनेमा बेल बॉटमची प्रदर्शित होण्याची तारीख घोषित केली आहे. अक्षय कुमार याने ट्विट करत म्हटले आहे की, त्याचा स्पाय थ्रिलर सिनेमा बेल बॉटम हा पुढील महिन्यात म्हणजेच 19 ऑगस्ट रोजी सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. तसेच अक्षय याने एक टीझर सुद्धा शेअर केला आहे. त्यामध्ये बेल बॉटमची संपूर्ण टीम दिसून येत आहे. त्याचसोबत असे ही त्याने म्हटले की, सिनेमा 19 ऑगस्ट 2021 रोजी वर्ल्ड वाइड सिनेमागृहांमध्ये दाखवला जाणार आहे.

अक्षय कुमार याने ट्विट करत लिहिले की, तुमचे मनोरंजन करण्यासाठी बेल बॉटम येत्या 19 ऑगस्ट रोजी तुमच्या भेटीला येणार आहे.(Shreyas Talpade चं मराठी टेलिव्हिजन वर पुनरागमन; ‘माझी तुझी रेशीमगाठ' मधून रसिकांच्या भेटीला; पहा प्रोमो)

Tweet:

दरम्यान, बेल बॉटम हा सिनेमा गेल्याच वर्षी प्रदर्शित होणार होता. मात्र कोरोनाच्या स्थितीमुळे त्याची प्रदर्शित होण्याची तारीख पुढे ढकलली गेली होती. खासियत अशी की, कोरोना व्हायरसच्या काळानंतर अक्षय कुमार याचा पहिलाच सिनेमा होता ज्याचे शुटिंग शेड्युल इंटरनॅशनली झाले आहे. या सिनेमा मध्ये अक्षय कुमार याच्यासह वाणी कपूर, लारा दत्ता, हुमा कुरेशी सुद्धा मुख्य भुमिकेत दिसून येणार आहेत. हा सिनेमा एका खऱ्या घटनेवर आधारित असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे प्रेक्षकांमध्ये या सिनेमाबद्दल अधिक उत्सुकता निर्माण झाली आहे.