Akshay Kumar Tests Positive For Covid-19: अक्षय कुमारला कोरोनाची लागण; अनंत-राधिकाच्या लग्नाला राहणार अनुपस्थित

अक्षय कुमार त्याचा चित्रपट सरफिराच्या प्रमोशनमध्ये खूप व्यस्त होता. यावेळीच त्याला अस्वस्थ वाटत होते. प्रमोशनल टीमशी संबंधित काही लोक कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे त्याला बाकीच्या टीमकडून कळले, तेव्हा अक्षय कुमारनेही कोविड चाचणी करण्याचा निर्णय घेतला आणि त्याचा अंदाज खरा निघाला.

Akshay Kumar Tests Positive For Covid-19: अक्षय कुमारला कोरोनाची लागण; अनंत-राधिकाच्या लग्नाला राहणार अनुपस्थित
Akshay Kumar (PC - X/ANI)

Akshay Kumar Tests Positive For Covid-19: बॉलीवूड सुपरस्टार अक्षय कुमार (Akshay Kumar) चा चित्रपट सरफिरे 12 जुलै 2024 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. अभिनेत्याने मोठ्या उत्साहात आपल्या चित्रपटाचे प्रमोशन केले. पण दुर्दैवाने आता तो चित्रपटाच्या प्रमोशनच्या अंतिम टप्प्यात सहभागी होऊ शकणार नाही. तसेच, तो अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या भव्य लग्नाचा भाग होऊ शकणार नाही. कारण, अक्षय कुमारची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आढळली आहे. अभिनेत्याने स्वतःला क्वारंटाईन केलं आहे. अक्षयला त्याच्या लग्नाचे आमंत्रण देण्यासाठी अनंत अंबानी स्वतः त्याच्या घरी आले होते. मात्र, आता अक्षय कुमारला कोरोनाची लागण झाल्यानंतर या कार्यक्रमात तो उपस्थित राहणार नाही.

अक्षय कुमार त्याचा चित्रपट सरफिराच्या प्रमोशनमध्ये खूप व्यस्त होता. यावेळीच त्याला अस्वस्थ वाटत होते. प्रमोशनल टीमशी संबंधित काही लोक कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे त्याला बाकीच्या टीमकडून कळले, तेव्हा अक्षय कुमारनेही कोविड चाचणी करण्याचा निर्णय घेतला आणि त्याचा अंदाज खरा निघाला. त्यालाही कोरोनाची लागण झाली असून तो आता योग्य ती खबरदारी घेत आहे. शुक्रवारी सकाळी तो कोरोना पॉझिटिव्ह आढळला आणि त्यादरम्यान त्याने स्वत:ला पूर्णपणे वेगळे केले. (हेही वाचा -Anant Ambani and Radhika Merchant Wedding: अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटच्या रॉयल वेडिंगचा होणार आंतरराष्ट्रीय प्रीमियर; किम कार्दशियन करणार शूट)

अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा विवाह आज म्हणजेच 12 जुलै रोजी होणार आहे. या लग्नसोहळ्याला माइक टायसन, जॉन सीना, जस्टिन बीबर आणि किम कार्दशियन यांसारखे परदेशी कलाकार उपस्थित राहिले आहेत. याशिवाय, बॉलिवूडचा सुपरस्टार शाहरुख खानही या खास सोहळ्याला हजेरी लावली. (हेही वाचा -Anant Ambani and Radhika Merchant Wedding: आज अडकणार अनंत आणि राधिका विवाहबंधनात, देश-विदेशातील बड्या व्यक्तींच्या विशेष उपस्थितीत होणार सोहळा)

अक्षय कुमारच्या सरफिरा चित्रपटाबद्दल बोलायचे तर हा चित्रपट आज म्हणजेच 12 जुलै रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आहे. आता हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर किती कमाई करतो हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

(The above story first appeared on LatestLY on Jul 12, 2024 03:18 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).