Anant Ambani and Radhika Merchant Wedding: अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटच्या रॉयल वेडिंगचा होणार आंतरराष्ट्रीय प्रीमियर; किम कार्दशियन करणार शूट

किम कार्दशियनचे ताजमहाल हॉटेल, मुंबई येथे आगमन झाल्यावर तिचे भव्य स्वागत करण्यात आले. विमानतळावर अभिनेत्रीची कारही पापाराझींनी घेरली होती. किमने 'हाय इंडिया' असे कॅप्शन देऊन एक व्हिडिओ शेअर केला आहे. तिने हॉटेलमधील तिच्या स्वागताचे काही क्षण देखील पोस्ट केले, जिथे तिचे पारंपारिक हार आणि टिक्का लावून स्वागत करण्यात आले.

Anant Ambani and Radhika Merchant Wedding: अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटच्या रॉयल वेडिंगचा होणार आंतरराष्ट्रीय प्रीमियर; किम कार्दशियन करणार शूट
Kim Kardashian, Anant Ambani and Radhika Merchant (PC - Instagram)

Anant Ambani and Radhika Merchant Wedding: आज म्हणजेच 12 जुलै रोजी अनंत अंबानी (Anant Ambani) आणि राधिका मर्चंट (Radhika Merchant) च्या लग्नाला उपस्थित राहण्यासाठी रिॲलिटी टीव्ही स्टार किम कार्दशियन (Kim Kardashian) आणि तिची बहीण ख्लो कार्दशियन गुरुवारी मुंबईत दाखल झाल्या. किम कार्दशियनचे ताजमहाल हॉटेल, मुंबई येथे आगमन झाल्यावर तिचे भव्य स्वागत करण्यात आले. विमानतळावर अभिनेत्रीची कारही पापाराझींनी घेरली होती. किमने 'हाय इंडिया' असे कॅप्शन देऊन एक व्हिडिओ शेअर केला आहे. तिने हॉटेलमधील तिच्या स्वागताचे काही क्षण देखील पोस्ट केले, जिथे तिचे पारंपारिक हार आणि टिक्का लावून स्वागत करण्यात आले.

दरम्यान, इंडिया टुडेने दिलेल्या वृत्तानुसार, किम आणि ख्लो त्यांच्या हुलू रिॲलिटी शो 'द कार्दशियन्स' साठी अंबानी लग्नाचे शूट करणार आहेत. या दोघींनी त्यांच्या संपूर्ण ग्लॅम टीमला सोबत आणले आहे, ज्यात हेअरस्टायलिस्ट ख्रिस ऍपलटन आणि चित्रीकरण निर्माते यांचा समावेश आहे. (हेही वाचा -Anant Ambani and Radhika Merchant Wedding: आज अडकणार अनंत आणि राधिका विवाहबंधनात, देश-विदेशातील बड्या व्यक्तींच्या विशेष उपस्थितीत होणार सोहळा)

'द कार्दशियन्स' शोचा सध्या पाचव्या सीझन सुरू आहे. आगामी सहाव्या सीझनमध्ये अंबानीच्या लग्नातील हायलाइट्स दाखवण्याची शक्यता आहे. किम आणि ख्लो यांची ही पहिलीच भारत भेट आहे. किम अनंत आणि राधिकाच्या लग्नाच्या सोहळ्यासाठी तहिलियानी लेहंगामध्ये दिसणार आहे. (हेही वाचा - Anant-Radhika Wedding: अनंत अंबानी-राधिका मर्चंटच्या लग्नातील पाहुण्यांना मिळणार सुपर लक्झरी ट्रीटमेंट; 100 खाजगी जेट आणि 3 फाल्कन-2000 विमानांनी होणार स्वागत)

 

View this post on Instagram

 

A post shared by Richa Begani (@richarbegani)

अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटचे लग्न तीन दिवस चालणार असून 12 जुलैला 'शुभ विवाह', 13 जुलैला 'शुभ आशीर्वाद' आणि 14 जुलैला भव्य रिसेप्शन असे कार्यक्रम पार पडणार आहेत. अनंत अंबानीच्या लग्नाला जॉन सीना, माइक टायसन, जीन-क्लॉड व्हॅन डॅमे आणि जे शेट्टी, बोरिस जॉन्सन, टोनी ब्लेअर, जॉन केरी आणि स्टीफन हार्पर यांसारख्या मान्यवरांसह इतर जागतिक सेलिब्रिटींची उपस्थिती असणार आहे.

(The above story first appeared on LatestLY on Jul 12, 2024 01:10 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).