Akshay Kumar in Man vs. Wild: 'रसोडे में बेयर ग्रिल्स था' असे सांगत अक्षय कुमार ने शेअर केला हा मजेशीर फोटो; पाहून चाहतेही झाले लोटपोट
अक्षय कुमार ने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर आपला 'Into the Wild With Bear Grylls' कार्यक्रमातील बेयर सोबतचा फोटो शेअर करुन 'रसोड़े में बेयर ग्रिल्स था आणि तुम्ही अंदाज लावू शकता की तो काय शिजवत आहे' असे म्हटले आहे.
डिस्कव्हरी चॅनेलच्या माध्यमातून अख्ख्या जगाला जंगलातील जीवन आणि तेथे सुख सुविधांपासून दूर राहून जगायचे कसे याचे धडे देणा-या बेयर ग्रिल्स चा 'Into the Wild With Bear Grylls' हा शो सध्या प्रचंड चर्चेत आहे. त्याला कारणही तसेच आहे. या शो मधून बॉलिवूड खिलाडी अक्षय कुमारा लवकरच झळकणार आहे. त्यामुळे त्याच्या चाहत्यांची या एपिसोड्सबद्दलची उत्सुकता आणखीनच शिगेला पोहोचली आहे. ही उत्सुकता आणखीन वाढविण्यासाठी अक्षयने सोशल मिडियावर व्हायरल होत असलेल्या 'रसोड़े में कौन था' याचा आधार घेऊन बेयरसोबतचा एक मजेशीर फोटो सोशल मिडियावर शेअर केला आहे.
अक्षय कुमार ने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर आपला 'Into the Wild With Bear Grylls' कार्यक्रमातील बेयर सोबतचा फोटो शेअर करुन 'रसोड़े में बेयर ग्रिल्स था आणि तुम्ही अंदाज लावू शकता की तो काय शिजवत आहे' असे म्हटले आहे. Into The Wild With Bear Grylls: खिलाडी अक्षय कुमार आणि बेयर ग्रिल्स च्या शोचा नवा प्रोमो आला समोर; पाहा साहसी प्रवासाचा थरकाप उडविणारा व्हिडिओ
अक्षय कुमार ने शेअर केलेला हा फोटो सोशल मिडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. हा फोटो पाहून त्याच्या चाहत्यांना आपले हसू अनावर झाले आहे. त्यामुळे त्यांनीही या फोटोला कमेंट्स करायला सुरुवात केली आहे.
हा कार्यक्रम येत्या 11 सप्टेंबरला आणि त्यानंतर 14 सप्टेंबरला डिस्कवरी चॅनेलवर पाहता येईल. अक्षय कुमार हा बेयर ग्रिल्स सोबत शो करणारा पहिला बॉलिवूड कलाकार ठरला आहे. दरम्यान आता क्रिकेटर विराट कोहली देखील आगामी एपिसोड्समध्ये दिसू शकतो अशी चर्चा आहे.