Sooryavanshi On Netflix: सूर्यवंशी नेटफ्लिक्सवर होणार प्रदर्शित, चित्रपटाची झाली 'इतकी' कोटींची डील
कोरोना महामारीनंतर कोणत्याही चित्रपटाला हा करार मिळालेला नाही. चित्रपटाच्या पैशाचे सर्व श्रेय रोहित शेट्टीला जाते, जो या काळातील सर्वात यशस्वी दिग्दर्शक आहे.
बॉलिवूड (Bollywood) अभिनेता अक्षय कुमारचा (Akshay Kumar) नुकताच प्रदर्शित झालेला सूर्यवंशी (Sooryavanshi) चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी करत आहे. 'सूर्यवंशी' चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 7 दिवसांचा प्रवास पूर्ण केला असून पहिल्याच आठवड्यात या चित्रपटाने 120 कोटींची कमाई केली आहे. सूर्यवंशी चित्रपटाच्या बंपर कमाईमुळे केवळ निर्मातेच नव्हे तर व्यापार तज्ञही खूश आहेत. चित्रपटाची ज्या प्रकारे कमाई सुरू आहे, त्यावरून प्रेक्षक पुन्हा चांगल्या चित्रपट पाहण्यासाठी सज्ज झाल्याचे ट्रेड तज्ज्ञांचे मत आहे.
अजय देवगणच्या सिंघम आणि रणवीर सिंगच्या सिम्बा नंतर सूर्यवंशी हा रोहित शेट्टीचा तिसरा पोलिसांनवर अधारित चित्रपट आहे. सूर्यवंशी बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत आहे, परंतु त्यासोबतच हा चित्रपट निर्मात्यांना इतर मार्गांनीही भरपूर नफा देत आहे. मिळालेल्या अहवालानुसार, सूर्यवंशी चित्रपटाच्या निर्मात्यांनी ओटीटी रिलीजसाठी नेटफ्लिक्सशी हातमिळवणी केली आहे. नेटफ्लिक्सने सूर्यवंशी हा चित्रपट १०० कोटींना विकत घेतला आहे. कोरोनानंतर बॉलिवूड चित्रपटासाठी दिलेली ही सर्वात मोठी रक्कम आहे. कोरोना महामारीनंतर कोणत्याही चित्रपटाला हा करार मिळालेला नाही. चित्रपटाच्या पैशाचे सर्व श्रेय रोहित शेट्टीला जाते, जो या काळातील सर्वात यशस्वी दिग्दर्शक आहे. (हे ही वाचा Govinda Naam Mera: विकी कौशलचा फुल डाॅन्स स्टाईल अंदाज, भूमी आणि कियाराचा फर्स्ट लूकही आला समोर.)
अक्षय कुमारने चित्रपटाविषयीचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्याने लिहिले आहे की, 'पुन्हा एकदा सिनेमाला तुमच्या आयुष्यात स्थान दिल्याबद्दल धन्यवाद. हा प्रतिसाद टीम सूर्यवंशीसाठी महत्त्वाचा आहे. आम्ही तुमच्याशिवाय काही नाही, धन्यवाद.' सूर्यवंशीमध्ये अक्षय कुमार व्यतिरिक्त आणि कतरिना कैफ, अजय देवगण, रणवीर सिंग यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत, कोरोना महामारीनंतर यशस्वी झालेला हा पहिला चित्रपट आहे.