Akshay Kumar चा Bachchan Pandey चित्रपट होळीच्या मुहूर्तावर 'या' दिवशी होणार चित्रपटगृहात प्रदर्शित

रिलीजच्या तारखेच्या घोषणेसोबतचं अक्षयने चित्रपटातील त्याचा खतरनाक लूक शेअर केला आहे.

Bachchan Pandey (PC- Instagram)

अक्षय कुमार (Akshay Kumar) चा आगामी अॅक्शन आणि कॉमेडी चित्रपट 'बच्चन पांडे' (Bachchan Pandey) यावर्षी होळीच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणार आहे. अक्षयने चित्रपटाच्या नवीन पोस्टरसह रिलीजची घोषणा केली. रिलीजच्या तारखेच्या घोषणेसोबतचं अक्षयने चित्रपटातील त्याचा खतरनाक लूक शेअर केला आहे. अक्षयचा हा लूक पाहून चाहते चित्रपटासाठी उत्सुक झाले आहेत. या चित्रपटात अक्षयसोबत क्रिती सेनन आणि जॅकलीन फर्नांडिस, अर्शद वारसी, संजय मिश्रा यांच्याही भूमिका आहेत. विशेष म्हणजे टीव्हीचा आवडता स्टार गौरव चोप्रा या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. चित्रपटात गौरव महत्त्वाची भूमिका साकारणार आहे. विशेष म्हणजे 'बच्चन पांडे' चित्रपटात अक्षय कुमार एका गँगस्टरच्या भूमिकेत दिसणार आहे. ज्याला अभिनेता व्हायचे आहे. तर क्रिती सॅनन एका पत्रकाराच्या भूमिकेत आहे. जी दिग्दर्शक बनण्याची इच्छा बाळगते.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, हा साऊथचा चित्रपट 'जिगरथंडा'चा रिमेक आहे. याआधी 'बच्चन पांडे' 2021 मध्ये ख्रिसमसला रिलीज होणार होता. परंतु, तो 4 मार्च 2022 रोजी रिलीज होणार असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र, आता नव्या घोषणेनुसार तो 18 मार्च रोजी चित्रपटगृहांमध्ये दिसणार आहे. (वाचा - ऑस्करच्या यूट्यूब चॅनलवर दाखवण्यात आला 'Jai Bhim' चित्रपट; Suriya चे चाहते म्हणाले, 'देशाची शान आहे अभिनेता')

अक्षयने शेअर केले दोन पोस्टर -

अक्षयने त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर चित्रपटाचे दोन पोस्टर शेअर केले आहेत. पोस्टर शेअर करताना अक्षयने लिहिले आहे की, "अॅक्शन कॉमेडी रोमान्स ड्रामा L-O-A-D-I-N-G या होळी! 18 मार्च 2022 रोजी फरहाद सामजी दिग्दर्शित बच्चन पांडे सिनेमागृहात."

 

View this post on Instagram

 

A post shared by Akshay Kumar (@akshaykumar)

दरम्यान, 'बच्चन पांडे'च्या पोस्टरमध्ये अक्षय बटणविरहित शर्टमध्ये, डोक्यावर लाल कपडा बांधलेला दिसत आहे. यात अक्षयने खांद्यावर बंदूक आणि इतर शस्त्रांनी भरलेली पिशवी घेतली असून डोळ्यांवर चष्मा घातलेला आहे. याशिवाय गळ्यात जाड साखळी घातलेली आहे. यात तो खरा गुंड दिसत आहे. दुसऱ्या पोस्टरमध्ये तो त्याच्या गँगस्टर टीमसोबत किलरच्या भूमिकेत बॉनेटवर बसलेला दिसत आहे.