Akshay Kumar-Raveena Tandon Video: ब्रेकअपनंतर तब्बल 22 वर्षांनी एकत्र दिसले अक्षय कुमार आणि रवीना टंडन, पहा व्हिडिओ

रवीना आणि अक्षयला त्यांच्या ब्रेकअपच्या इतक्या वर्षांनंतर पहिल्यांदाच एकत्र पाहण्याची संधी चाहत्यांना मिळाली. आश्चर्याची गोष्ट म्हणजे या अवॉर्ड शोमध्ये अक्षय कुमारला 'स्टाईल हॉल ऑफ फेम' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. रवीना टंडनने स्वतः तिच्या माजी प्रियकराला हा पुरस्कार दिला.

Akshay Kumar-Raveena Tandon Video: ब्रेकअपनंतर तब्बल 22 वर्षांनी एकत्र दिसले अक्षय कुमार आणि रवीना टंडन, पहा व्हिडिओ
Akshay Kumar-Raveena Tandon (PC - Instagram)

Akshay Kumar-Raveena Tandon Video: रवीना टंडन (Raveena Tandon) आणि अक्षय कुमार (Akshay Kumar) यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये दोघेही एकमेकांच्या अगदी जवळ दिसत आहेत. व्हिडिओमध्ये दोघांच्या चेहऱ्यावर भरभरुन आनंद पाहायला मिळत आहे. या दोन्ही स्टार्सला बऱ्याच दिवसांनी एकत्र बघून चाहतेही खूप खूश आहेत. अक्षय कुमार आणि रवीना टंडन यांची प्रेमकहाणी आणि ब्रेकअप हा बॉलिवूडमध्ये चर्चेचा विषय आहे. त्यांच्या ब्रेकअपला दोन दशकांहून अधिक काळ लोटला आहे, त्यानंतर दोघांनी वेगवेगळ्या लोकांशी लग्न केले आणि त्यांचे आयुष्य पुढे नेले.

रवीना आणि अक्षयला त्यांच्या ब्रेकअपच्या इतक्या वर्षांनंतर पहिल्यांदाच एकत्र पाहण्याची संधी चाहत्यांना मिळाली. आश्चर्याची गोष्ट म्हणजे या अवॉर्ड शोमध्ये अक्षय कुमारला 'स्टाईल हॉल ऑफ फेम' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. रवीना टंडनने स्वतः तिच्या माजी प्रियकराला हा पुरस्कार दिला. याशिवाय रवीनानेही अक्षयचे जोरदार कौतुक केले. यादरम्यान दोघांच्या चेहऱ्यावर आनंद ओसांडून वाहत होता. (हेही वाचा - Jawan Release Date: मोशन पोस्टर शेअर करुन शाहरुखचा 'जवान' 'या' दिवशी होणार प्रर्दशित, पुन्हा दिसणार दमदार भूमिकेत)

अक्षय जेव्हा पुरस्कार घेण्यासाठी मंचावर आला तेव्हा त्याने रवीनाला मिठी मारली. यानंतर रवीनाने अक्षय कुमारला हा पुरस्कार दिला. विशेष म्हणजे अक्षय कुमार आणि रवीना टंडनचा हा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये दोघेही एकत्र बोलताना दिसत आहेत. यामध्ये रवीना अक्षयला काहीतरी म्हणते, जिथे अक्षय डोके हलवून हो म्हणताना दिसत आहे.

रवीना टंडन आणि अक्षय कुमार यांच्या प्रेमाच्या बॉलिवूडमध्ये चर्चा होत होत्या. दोघांनाही लग्न करायचे होते. 'मोहरा' चित्रपटाच्या सेटवर ते एकमेकांच्या प्रेमात पडले होते. दोघांचीही एंगेजमेंट झाली होती. पण, त्यांचे लग्न होऊ शकले नाही आणि त्यांचे ब्रेकअप झाले.

 

View this post on Instagram

 

A post shared by Akshay Kumar🔵 (@jr_khiladi_sandip)

अक्षयने केलेला विश्वासघात रवीना टंडन अजूनही विसरलेली नाही. अक्षयकडून भेटलेल्या विश्वासघाताबद्दल ती अनेकदा माध्यमांसमोर बोलली आहे. घटस्फोट किंवा ब्रेकअपनंतर लोक आयुष्यात पुढे जातात, पण रवीनाने अनेकदा अक्षयवर आपली व्यथा सर्वांसमोर मांडून फसवणूक केल्याचा आरोप केला आहे. ब्रेकअपनंतर दोघेही कोणत्याही चित्रपटात किंवा कोणत्याही फंक्शनमध्येही दिसले नाहीत. हे दोघे पहिल्यांदाच या पुरस्कार सोहळ्यात एकत्र आले आहेत.

(The above story first appeared on LatestLY on May 08, 2023 01:38 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).