Jawan Release Date: मोशन पोस्टर शेअर करुन शाहरुखचा 'जवान' 'या' दिवशी होणार प्रर्दशित, पुन्हा दिसणार दमदार भूमिकेत
अलीकडेच दोघे 'पठाण' (Pathan) चित्रपटात एकत्र दिसले होते. आता दोघेही लवकरच 'जवान' (Jawan) चित्रपटात दिसणार आहेत. दरम्यान, या चित्रपटाची रिलीज डेट समोर आली आहे. चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या तारखेत बदल करण्यात आला आहे.
शाहरुख खान (Saha Rukh Khan) आणि अभिनेत्री दीपिका पदुकोण (Deepika Padukon) यांची केमिस्ट्री छान दिसतेय. अलीकडेच दोघे 'पठाण' (Pathan) चित्रपटात एकत्र दिसले होते. आता दोघेही लवकरच 'जवान' (Jawan) चित्रपटात दिसणार आहेत. दरम्यान, या चित्रपटाची रिलीज डेट समोर आली आहे. चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या तारखेत बदल करण्यात आला आहे. शाहरुख खानने त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम हँडलवर 'जवान'चे नवीनतम मोशन पोस्टर शेअर करून चित्रपटाची नवीन रिलीज तारीख उघड केली आहे. 'जवान' हा चित्रपट आता 7 सप्टेंबर 2023 रोजी प्रदर्शित होणार आहे. नुकतेच रिलीज झालेले मोशन पोस्टर पाहिल्यानंतर चाहते खूप उत्सुक दिसत आहेत. या मोशन पोस्टरमध्ये किंग खान अतिशय दमदार स्टाईलमध्ये दिसत आहे. शाहरुखच्या हातात भाला आणि अंगभर पट्टी आहे.
#Jawan #7thSeptember2023 pic.twitter.com/7pBFy5Dfng
— Shah Rukh Khan (@iamsrk) May 6, 2023
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on May 06, 2023 10:08 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

