AK vs AK Controversy: अनिल कपूर याचा Netflix वरील ऐके विरुद्ध ऐके चित्रपट वादाच्या भोवऱ्यात, IAF च्या युनिफॉर्मवरुन भारतीय हवाई दलाचा आक्षेप
कारण ऐके विरुद्ध ऐके मध्ये वायुनसेनेच्या अधिकाऱ्याला ज्या पद्धतीने दाखवले गेले आहे त्यावर आता हवाई दलाने आक्षेप घेतला आहे.
AK vs AK Controversy: बॉलिवूड अभिनेता अनिल कपूर (Anil Kapoor) याचा नेटफ्लिक्सवरील (Netflix) आगामी चित्रपट AKvsAK वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. कारण ऐके विरुद्ध ऐके मध्ये वायुनसेनेच्या अधिकाऱ्याला ज्या पद्धतीने दाखवले गेले आहे त्यावर आता हवाई दलाने आक्षेप घेतला आहे. बुधवारी हवाई दलाकडून (Indian Air Force) या संबंधित एक ट्विट सुद्धा करण्यात आले आहे. ज्यामध्ये असे म्हटले होते की, या पद्धतीचा सिन तातडीने हटवावा.(Jug Jugg Jeeyo च्या सेटवर कोरोनाचा हैदोस! वरुण धवन, नीतू सिंह आणि अनिल कपूर आढळले COVID-19 पॉझिटिव्ह)
नेटफ्लिक्सवर अनिल कपुर याचा एक प्रोजेक्ट लॉन्च होणार आहे. त्याचे नाव AKvsAK असून त्याचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. ज्यामध्ये अनिल कपूर याने एका वायुसेना अधिकाऱ्याची भुमिका साकारली आहे. सिनमध्ये बॉलिवूड दिग्दर्शक अनुराग कश्यप सुद्धा दिसून येत आहे. या दोघांमध्ये वाईट शब्दांमध्ये संभाषण सुरु असल्याचे दाखवले गेले आहे.(Adipurush: सैफ अली खान याचा चित्रपट 'आदिपुरुष' प्रदर्शनापुर्वीच वादाच्या भोवऱ्यात; कारण घ्या जाणून)
Tweet:
यावरच आता हवाई दलाने आक्षेप घेतला असून त्या संदर्भातील ट्विट मध्ये असे म्हटले आहे की, वायुसेनेच्या वर्दीचा चुकीच्या पद्धतीने वापर केला असून भाषा सुद्धा योग्य नाही आहे. ही वर्दी घालून देशातील जवानांची प्रतिमा मलील होत आहे. त्यामुळे हा सिन काढून टाकण्यात यावा.
दरम्यान, यापूर्वी सुद्धा सेनेच्या अधिकाऱ्यांच्या वर्दीबद्दल बॉलिवूड मधील एखाद्याचित्रपटात किंवा बेव शो च्या माध्यमातून चुकीच्या पद्धतीने दाखवल्याने आक्षेप घेण्यात आला आहे. गेल्याच काही दिवसांपूर्वी एकता कपूर हिच्या एका वेब शोमध्ये सेनेच्या वर्दीतील भुमिका साकारणाऱ्या कलाकारासोबत चुकीचे दाखवण्यात आले होते. त्यावरुन ही वाद निर्माण झाला होता.