Aishwarya Rai-Bachchan Tested Negative For Coronavirus: ऐश्वर्या राय-बच्चन व आराध्या बच्चन यांची कोरोना विषाणू चाचणी आली निगेटिव्ह; हॉस्पिटलमधून घरी रवानगी

11 जुलै रोजी अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) व अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan) यांना कोरोना विषाणूची लागण झाल्याची बातमी आली होती.

Abhishek, Aishwarya Rai Bachchan, Aaradhya (Photo Credits: Instagram)

देशात वाढत असलेल्या कोरोना विषाणू (Coronavirus) संक्रमणाचा धोका आता अतिसुरक्षित समजले जाणारे सेलेब्ज यांनाही पोहोचत आहे. 11 जुलै रोजी अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) व अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan) यांना कोरोना विषाणूची लागण झाल्याची बातमी आली होती. या दोघांनाही मुंबईच्या नानावटी रुग्णालयात दाखल केल्यानंतर लगेच ऐश्वर्या राय-बच्चन  (Aishwarya Rai-Bachchan) व आराध्या बच्चन (Aaradhya Bachchan) यांचीही कोरोनाची चाचणी सकारात्मक आली होती. त्यानंतर बच्चन कुटुंबासाठी अनेकांनी प्रार्थना केल्या होत्या व आता त्याचे फळ दिसत आहे. नुकतेच माहिती मिळत आहे की, ऐश्वर्या बच्चन व आराध्या यांची कोरोनाची चाचणी नकारात्मक आली आहे.

अभिषेक बच्चन ट्वीट -

स्वतः अभिषेक बच्चन याने ट्वीट करत ही बातमी दिली आहे. यामध्ये तो म्हणतो- ‘तुमच्या निरंतर होणाऱ्या प्रार्थना आणि शुभेच्छा दिल्याबद्दल सर्वांचे आभार. ऐश्वर्या आणि आराध्या यांची कोरोनाची चाचणी नकारात्मक आली असून, त्यांना रुग्णालयातून सोडण्यात आले आहे. ते आता घरी असतील. माझे वडील (अमिताभ बच्चन) आणि मी वैद्यकीय कर्मचार्‍यांच्या देखरेखीखाली रुग्णालयातच आहोत’. तर अशाप्रकारे आता ऐश्वर्या आणि आराध्या कोरोनामुक्त झाले आहेत. अमिताभ बच्चन व अभिषेक बच्चन यांचीही कोरोनची चाचणी लवकरच नकारात्मक येऊ दे अशी प्रार्थना. (हेही वाचा: विराट कोहलीचा क्वारंटाइन एक्सपेरिमेंट, अनुष्का शर्माच्या वाढदिवशी बनवला होता केक, पाहा तिची प्रतिक्रिया (Watch Video))

11 जुलै रोजी अमिताभ व अभिषेक अशा दोघांनीही आपली चाचणी सकारात्मक आल्याची माहिती दिली होती. त्यानंतर संपूर्ण देशभरात बच्चन कुटुंबियांबाबत प्रार्थना होत होत्या. दरम्यान, ऐश्वर्या व आराध्या यांची कोरोनाची चाचणी सकारात्मक आल्यावर काही दिवस त्यांना घरीच ठेवले होते. त्यानंतर ऐश्वर्याच्या घरी पिझ्झाची डिलिव्हरी झाल्याने तिच्यावर टीकाही झाली होती. पुढे दोघींचीही तब्येत खराब झाल्याने या दोघींनाही ताबडतोब नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. आता या दोघी कोरोनामुक्त असून, त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळत आहे.