Shraddha Kapoor Trolled: श्रद्धा कपूर बनणार इच्छाधारी 'नागिन'; चित्रपटाच्या घोषणेनंतर नेटीझन्सनी अभिनेत्रीला ट्रोल करत बनवले मजेशीर Memes

तिने यासंदर्भातील प्रोजेक्ट साईन केला आहे. काही चाहत्यांनी मात्र, श्रद्धाला सर्प भूमिकेमुळे ट्रोल केलं आहे. सध्या सोशल मीडियावर नेटिझन्सकडून श्रद्धाचे मजेदार मिम्स आणि विनोद शेअर करण्यात येत आहेत.

श्रद्धा कपूर (Photo Credits: Instagram)

Shraddha Kapoor Trolled: बॉलिवूडमध्ये इच्छाधारी सर्प ही संकल्पना खूप जुनी आणि प्रभावी आहे. 80 च्या दशकात दिवगंत अभिनेत्री श्रीदेवी (Sridevi) ने सर्पाची भूमिका साकारत प्रेक्षकांना घाबरवले होते. आता बर्‍याच वर्षांनंतर हा ट्रेंड पुन्हा येत असल्याचं दिसत आहे. अभिनेत्री श्रद्धा कपूर (Shraddha Kapoor) पहिल्यांदाचं मोठ्या पडद्यावर नागिनची भूमिका साकारणार आहे. तिने यासंदर्भातील प्रोजेक्ट साईन केला आहे. श्रद्धा कपूरच्या नव्या चित्रपटाचे नाव 'नागिन' (Naagin) आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन विशाल फुरिया करणार आहेत. चित्रपट समीक्षक तरण आदर्श यांनी यासंदर्भात आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून माहिती दिली आहे. या चित्रपटात श्रद्धा कपूर इच्छाधारी नागिन बनणार आहे. हा चित्रपट तीन भागांमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे निर्माता निखिल द्विवेदी हे आहेत. यापूर्वी रीना रॉय आणि श्रीदेवीसुद्धा इच्छुक नागिन बनल्या आहेत.

दरम्यान, आज श्रद्धा कपूरच्या आगामी नागिन चित्रपटाची घोषणा करण्यात आली. या चित्रपटात ती नागिनच्या भूमिकेत प्रेक्षकांचे मनोरंजन करणार आहे. श्रद्धानेही आपल्याला बालपणीपासूनचं असे पात्र साकारण्याची इच्छा असल्याचं ट्विट करत सांगितलं आहे. तसेच या चित्रपटासाठी उत्साही असल्याचं म्हटलं आहे. या चित्रपटाच्या घोषणेनंतर सोशल मीडियावर विविध प्रतिक्रिया समोर येत आहेत. श्रद्धाला या भूमिकेत पाहण्यासाठी काही चाहते उत्सूक आहेत. तर काही चाहत्यांनी मात्र, श्रद्धाला सर्प भूमिकेमुळे ट्रोल केलं आहे. सध्या सोशल मीडियावर नेटिझन्सकडून श्रद्धाचे मजेदार मिम्स आणि विनोद शेअर करण्यात येत आहेत. (हेही वाचा - ULLU Hot Web Series Video: उल्लू ओरिजनल्स च्या 'The Producer' या वेबसीरिजचा एक हॉट व्हिडिओ झाला व्हायरल, प्रोड्यूसर ने मॉडेल सोबत केले अश्लील चाळे)

पहा व्हायरल मीम्स - 

श्रद्धाने यापूर्वी स्त्री चित्रपटात भूताची भूमिका साकारली होती. मात्र, आता तिला नागिन बनताना पाहणं चाहत्यांसाठी औत्सुक्याचं ठरणार आहे. या चित्रपटातील श्रद्धाच्या भूमिकेबद्दल बरीच चर्चा रंगली आहे. श्रद्धा स्वत: देखील तिच्या नवीन प्रोजेक्टसाठी खूप उत्सुक आहे. एका न्यूज पोर्टलला दिलेल्या मुलाखतीत श्रद्धाने सांगितले की, ती श्रीदेवीची फॅन आहे. मी नागिनचे पात्र साकारणार आहे, याचा मला आनंद आहे. मी असे चित्रपट पाहून मोठी झाले आहे. मला श्रीदेवीची नगीना चित्रपट प्रचंड आवडतो. मला अशी व्यक्तिरेखा साकारायची होती. त्यामुळे आता या प्रोजेक्टच्या माध्यमातून मला चांगली संधी मिळाली आहे आणि याचा मला अत्यंत आनंद होत आहे, असंही श्रद्धाने सांगितलं आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif