Sushmita Sen: 'ताली'च्या पोस्टरवरुन सुष्मिता सेन ट्रोल, नकारात्मक कंमेट करणाऱ्या नेटकऱ्यांना केलं ब्लॉक
हा चित्रपट बहुचर्चित आहे.
Sushmita Sen: बॉलिवूडची सुप्रसिध्द अभिनेत्री सुष्मिता सेन हीने काही दिवसांपुर्वी तीच्या आगामी चित्रपट ताली चे पोस्टर शेअर केलं. दरम्यान हा पोस्टर पाहून नेटकऱ्यांनी तीच्या भुमिकेबद्दल टीका केली. ओटीटी प्लॅटफॉर्मवर सुष्मिता सेन आपल्या धमाकेदार अभिनयाने लोकांचे मनोरंजन करत असते. शेअर केलेल्या पोस्टर वर सुष्मिताने कॅप्शन देखील दिलं आहे. 'ताली- बजाऊँगी नहीं, बजवाऊँगी! . हा कॅप्शन पाहून नेटकऱ्यांनी तीची खिल्ली उडवली आहे. हे पाहून सुष्मिताने एक निर्णय घेतला आहे.
या चित्रपटात सुष्मिता एका ट्रान्सजेंडरची भूमिका साकारत आहे. सुष्मिता ट्रान्सजेंडर गौरी सावंत (Gauri Sawant) यांची भूमिका साकारत आहे. चित्रपटासाठी तीनं साडी, लाल टिकली अन् गळ्यात माळ अशा लुक केला आहे हा लुक पाहून नेटकऱ्यांनी तीला नकारात्मक कंमेट केलं आहे. पोस्टर मध्ये ती टाळी वाजवताना दिसत आहे. यावरून तीला ट्रोल करण्यात आले आहे. सुष्मिताने नकारात्मक कंमेट केलेल्या युजर्सना ब्लॉक केल आहे. पोस्टवर खोटे प्रोफाइल असलेले लोक 'छक्का' म्हणून कमेंट करत आहे. या सर्व यूजरला सुष्मिताने ब्लॉक केले आहे.
सुष्मिता सेन माध्यमांशी बोलताना म्हणाली की, "जर मला गौरी सावंतची भूमिका साकारूनही हे सर्व सहन होत नाही, त्यांची भूमिका साकारल्यामुळे मला असे खूप काही म्हटले जात आहे, तर मग खऱ्या आयुष्यात गौरीने स्वत: किती सहन केले असेल. त्या तर हे सर्व जगत आल्या आहेत."
ही सीरिज 15 ऑगस्ट 2023 रोजी जिओ सिनेमावर प्रदर्शित होत आहे. रवी जाधव (Ravi jadhav) दिग्दर्शित या सीरिजचं लेखन क्षितीज पटवर्धन (Kshitij Patwardhan) यांनी केलं आहे. 'ताली' या वेबसीरिजचे सहा एपिसोड असणार आहेत. बहुचर्चित हा चित्रपट पाहण्यासाठी काही प्रेक्षकांनी वाट पाहिली आहे. सुष्मिता नेहमीच वेगवेगळ्या भुमिका साकरते.