अभिनेता इरफान खान ह्याचा कॅन्सरशी यशस्वी लढा, चाहत्यांचे मानले आभार
बॉलिवूड मधील दिग्गज अभिनेता इरफान खान (Irfan Khan) हा गेल्या काही काळापासून त्याच्या आजारपणामुळे दूर गेला होता.
बॉलिवूड मधील दिग्गज अभिनेता इरफान खान (Irfan Khan) हा गेल्या काही काळापासून त्याच्या आजारपणामुळे दूर गेला होता. तर इरफान हा न्यूरो एंडोक्राइन ट्युमरच्या आजाराने ग्रासला होता. परंतु आता इरफानने या आजारपणावर यशस्वीपणे मात केली असून तो लंडहून भारतात परतला आहे. तसेच चाहत्यांचे आभार मानत एक भाऊक पोस्ट सोशल मीडियावर पोस्ट केली आहे.
इरफान खान ह्याला दोन दिवसांपूर्वी छत्रपती इंटरनॅशन विमातळावर पाहिले. त्यावेळी मीडियाने त्याच्या येण्यामुळे आनंद व्यक्त करत त्याचे फोटो व्हायरल केले. गेल्या वर्षी 16 मार्चला इरफान ह्याने त्याच्या आजारपणा बद्दल अधिकृतपणे माहिती दिली होती. त्यानंतर चाहत्यांनी त्याच्यासाठी प्रार्थना केल्याचे सुद्धा दिसून आले. मात्र आता इरफान पूर्णपणे आजारातून बरा झाल्याचे सांगण्यात आले आहे.(हेही वाचा-कॅन्सरशी झुंजत असलेला इरफान खान भारतात परतणार; 'या' सिनेमातून येणार प्रेक्षकांच्या भेटीला)
यामुळे चाहत्यांचे प्रेम आणि प्रार्थना यांचा आदर करत इरफान ह्याने आनंद व्यक्त केला आहे. तसेच पोस्टच्या माध्यमातून त्याच्या कठीण काळात ज्यांनी मदत केली त्यांचे सुद्धा त्याने आभार मानले आहेत.