कोरोनानंतर 'या' चित्रपटांनी परत आणले सिनेमागृहांचे वैभव, घ्या जाणुन
आज, या यादीमध्ये आम्ही अशाच चित्रपटांबद्दल सांगत आहोत ज्यांनी कोरोनाच्या कालावधीनंतर 100 कोटी किंवा त्याहून अधिक कमाई केली.
कोरोना महामारीचा सर्वांवर वाईट परिणाम झाला. बॉलिवूडही (Bollywood) त्याला अपवाद नव्हते. काही महिने शूटिंग थांबवण्यात आलं होतं. सेटवर काम सुरू असतानाही चित्रपटगृहांना टाळे लागले होते. जेव्हा चित्रपटगृहे उघडली, तेव्हा प्रेक्षक कोरोनाच्या काळात बाहेर जाणे आणि चित्रपट पाहणे टाळत होते. मात्र, हळूहळू परिस्थिती पूर्वपदावर येत आहे. यामध्ये त्या चित्रपटांचा मोठा वाटा आहे ज्याची लोक खूप दिवसांपासून वाट पाहत होते. हे चित्रपट बॉक्स ऑफिसवर (Box Office) प्रदर्शित झाले तेव्हा धमाका झाला. आज, या यादीमध्ये आम्ही अशाच चित्रपटांबद्दल सांगत आहोत ज्यांनी कोरोनाच्या कालावधीनंतर 100 कोटी किंवा त्याहून अधिक कमाई केली.
सूर्यवंशी
'सूर्यवंशी' 5 नोव्हेंबर 2021 रोजी रिलीज झाला. कोरोनामुळे निर्मात्यांनी जवळपास दीड वर्ष योग्य वेळेची वाट पाहिली. हा चित्रपट रोहित शेट्टीने दिग्दर्शित केला होता. यात अक्षय कुमार आणि कतरिना कैफ मुख्य भूमिकेत आहेत. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 294 कोटींची कमाई केली.
पुष्पा
अल्लू अर्जुन स्टारर चित्रपट 'पुष्पा' 17 डिसेंबर 2021 रोजी रिलीज झाला. चित्रपटाने सर्व भाषांमध्ये 365 कोटींचा व्यवसाय केला तर हिंदी भाषेतील कलेक्शन 108 कोटी होते.
83
रणवीर सिंहचा '83' हा चित्रपट 2021 च्या ख्रिसमसला आला होता. या बिग बजेट चित्रपटाने 109 कोटींचा गल्ला जमवला. या चित्रपटात रणवीरने कपिल देवची भूमिका साकारली होती.
गंगुबाई काठियावाडी
संजय लीला भन्साळी यांच्या 'गंगूबाई काठियावाडी' या चित्रपटाने 191 कोटींची कमाई केली. या चित्रपटात आलिया भट्ट मुख्य भूमिकेत दिसली होती.
'द काश्मीर फाइल्स'
विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित 'द काश्मीर फाइल्स'ने धमाल केली आहे. अनुपम खेर, मिथुन चक्रवर्ती, पल्लवी जोशी दर्शन कुमार यांच्यासह इतर कलाकार. या चित्रपटाने आतापर्यंत 200 कोटींहून अधिकचा व्यवसाय केला आहे.