IPL Auction 2025 Live

बॉलिवूड अभिनेता सोनू सूद नंतर बिग बी देखील करणार उत्तर प्रदेशच्या मजूरांना मदत

त्यामुळे देशात लॉकडाऊन पाळण्यात येत आहे. लॉकडाऊनमुळे विविध राज्यात अनेक मजूर अडकले आहेत. हे मजूर मिळेल त्या मार्गाने गावी परतत आहेत. यातील अनेकांनी पायी चालत गावाकडची वाट धरली आहे. या सर्वांना आपल्या गावी पोहोचण्यासाठी बॉलिवूड अभिनेता सोनू सूद ने मदतीचा हात पुढे केला आहे. सोनू सूदने या मजूरांना गावी पोहोच करण्यासाठी बसेसची सुविधा केली आहे.

Amitabh Bachchan (Photo Credits: Twitter)

चीनच्या वुहान शहरातून पसरलेल्या कोरोना विषाणूने (Coronavirus) संपूर्ण देशात धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे देशात लॉकडाऊन (Lockdown) पाळण्यात येत आहे. लॉकडाऊनमुळे विविध राज्यात अनेक मजूर अडकले आहेत. हे मजूर मिळेल त्या मार्गाने गावी परतत आहेत. यातील अनेकांनी पायी चालत गावाकडची वाट धरली आहे. या सर्वांना आपल्या गावी पोहोचण्यासाठी बॉलिवूड अभिनेता सोनू सूद (Sonu Sood) ने मदतीचा हात पुढे केला आहे. सोनू सूदने या मजूरांना गावी पोहोच करण्यासाठी बसेसची सुविधा केली आहे.

विशेष म्हणजे आता महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांनी देखील उत्तर प्रदेश च्या मजूरांना (Migrant Labourers) गावी पोहोचवण्यासाठी मदतीचा हात पुढे केला आहे. अमिताभ बच्चन यांची टीम अनेक प्रवासी मजूरांनी मुंबईतून उत्तर प्रदेशला पोहचवण्यासाठी मदत करत आहे. प्राप्त माहितीनुसार ही टीम 28 मे ला हाजी अली वरून उत्तर प्रदेशसाठी 10 पेक्षा जास्त बस पाठवणार आहे. (हेही वाचा - Natkhat First Look: विद्या बालन हिने शेअर केली पहिली शॉर्ट फिल्म 'नटखट' ची खास झलक)

 

View this post on Instagram

 

I don’t know why it hurts when we bite our tongue mistakenly. But it didn’t hurt when we bite it intentionally. And I still don’t understand why you are biting your tongue now !!!!! 🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣

A post shared by Amitabh Bachchan (@amitabhbachchan) on

 

नागराज मंजुळे यांचा Jhund सिनेमा अडचणीत; कॉपीराईट कायद्याचे उल्लंघन केल्याचा आरोप - Watch Video

दरम्यान, बिग बी मजूरांशिवाय कोरोना वॉरिअर्संनाही मदत करत आहेत. यापूर्वी अमिताभ यांनी मुंबईत 20 हजार पीपीई किट्स आणि फुड पॅकेट्स वाटली आहेत. अभिताभ यांच्या या सामाजिक कार्यामुळे त्यांच्या चाहत्यांनी त्यांचे कौतुक केले आहे. दरम्यान, सोनू सूद ने आतापर्यंत महाराष्ट्रात अडकलेल्या अनेक मजूरांना त्यांच्या गावी पोहोचवले आहे. जोपर्यंत सर्व मजूर आपल्या गावी पोहोचत नाहीत तोपर्यंत मदत कमी पडू देणार नाही, अशी भूमिका सोनू सूद यांनी घेतली आहे. त्यांच्या या भूमिकेचे सर्वांकडून कौतुक होत आहे.