रोजंदारी कामगारांना मदत करण्यासाठी अभिनेत्री वाणी कपूर चा हटके फंडा; 5 फॅन्ससोबत व्हर्च्युअल डेट वर जाउन जमवणार मदतनिधी
यासाठी आधी फॅन्सना डोनेशन करायचे आहे,त्यातुन पाच जणांची निवड केली जाणार आहे. या मार्गे पैसे जमवुन त्यातुन रोजंदारी कामगारांना व त्यांच्या कुटुंबियांच्या रोजच्या जेवणाची सोय केली जाणार आहे.
कोरोना व्हायरसच्या (Coronavirus) पार्श्वभुमीवर लागु करण्यात आलेल्या लॉकडाउन (Lockdown) काळात रोजंंदारी कामगारांचे पुरते हाल झाले आहेत. कामच बंद असल्याने या कर्मचार्यांच्या मिळकतीचे सर्व मार्ग बंद आहेत. या कामगारांच्या मदतीसाठी आजवर अनेक मंंडळींनी स्वच्छेने हात पुढे केला आहे. आता याच हेतुने बॉलिवूड अभिनेत्री वाणी कपूर (Vaani Kapoor) हिने सुद्धा एक खास निर्णय घेतला आहे. खरंतर मदतीसाठी निधी देउन अनेकांनी आतापर्यंत मदत केली आहे, मात्र वाणीने मदत कार्यात आपल्या फॅन्सना सुद्धा सामावुन घेण्यासाठी हा वेगळा मार्ग अवलंबला आहे. वाणी ने सांगितल्यानुसार ती आपल्या पाच लकी फॅन्ससोबत व्हर्च्युअल डेट (Virtual Date) वर जाणार आहे. यासाठी आधी फॅन्सना डोनेशन करायचे आहे,त्यातुन पाच जणांची निवड केली जाणार आहे. या मार्गे पैसे जमवुन त्यातुन रोजंदारी कामगारांना व त्यांच्या कुटुंबियांच्या रोजच्या जेवणाची सोय केली जाणार आहे.हे ही वाचा- अभिनेता सोनु सुद ने परराज्यात अडकलेल्या नागरिकांच्या घरी पाठवण्याच्या विनंंतीला दिलेली 'ही' उत्तरे पाहुन तुम्हीही व्हाल त्याचे फॅन,पहा ट्विटस
वाणी कपुर हिने या कामासाठी अभिनेता अर्जुन कपुर याच्या बहिणीच्या म्हणजेच अंशुला कपुर हिच्या फॅनकाइंड मार्फत आयोजन केले आहे. यानुसार सामान्य फॅन्सना सुद्धा अप्रत्यक्ष मार्गे गरजुंना मदत करण्याची संधी मिळते. तसेच त्यांच्या आवडत्या सेलिब्रिटीला भेटता सुद्धा येते. Amitabh Bachchan Helps Migrants: सुपरस्टार अमिताभ बच्चन यांच्या वतीने मजुरांना मूळगावी नेणाऱ्या 10 बस हाजी अली येथून उत्तर प्रदेश साठी रवाना (See Photos)
वाणी कपुर पोस्ट
दरम्यान या अॅक्टिव्हिटी मार्फत जमणारे पैसे हे गरजुंना दोन वेळेचे जेवण पुरवण्यासाठी वापरले जाणार आहे. महाराष्ट्र,बॅंगलोर, चेन्नई तसेच देशातील विविध भागातील कामगारांना मदत पुरवली जाणार आहे. मागील काळात बॉलिवूडच्या अनेक कलाकारांंनी कामगार व ,मजुरांना मदतीचा हात दिला होता. फिल्म इंडस्ट्री मधील रोंंजदारी कामगारांना राशन पुरवण्यापासुन ते परराज्यात अडकुन पडलेल्या मजुरांना त्यांच्या घरी पोहचवण्यापर्यंंत अनेक कामात सेलिब्रिटींनी आघाडीवर राहुन काम केले आहे.