बलात्कारावर वादग्रस्त वक्तव्य करणा-या भाजप आमदार सुरेंद्र सिंह वर भडकल्या अभिनेत्री कृती सेनन आणि स्वरा भास्कर, 'अशा' शब्दांत व्यक्त केला राग
'ये घटिया आदमी पुराना पापी है' असे सांगत यांच्यावर कडक टिका केली आहे
हाथरस सामूहिक बलात्कार (Hathras Gangrape Case) प्रकरणानंतर संपूर्ण देशातून संतापाची लाट उसळत आहे. दोषींवर लवकरात लवकर कारवाई व्हावी ही मागणी जोर धरू लागली आहे. मात्र दुसरीकडे उत्तर प्रदेशात या प्रकरणाला एक वेगळंच वेळण राजकारण सुरु असल्याचे चित्र गेल्या काही दिवसांपासून पाहायला मिळत आहे. सरकार आणि विरोधी पक्षामध्ये चांगलीच जुंपल्याचे चित्र दिसत आहे. अशातच बलियाचे भाजप आमदार सुरेंद्र सिंह (Surendra Singh) यांनी बलात्कारावर केलेल्या वादग्रस्त विधानामुळे हे प्रकरण आता आणखीनच चिघळलय. 'चांगले संस्कारच बलात्कार रोखू शकतात' असं वक्तव्य करणा-या या नेत्यावर देशभरातून टिका केली जात आहे. अभिनेत्री कृती सेनन (Kriti Sanon) आणि स्वरा भास्कर (Swara Bhaskar) यांनी देखील ट्विटच्या माध्यमातून आपला राग व्यक्त केला आहे.
अभिनेत्री स्वरा भास्कर ने आमदार सुरेंद्र सिंह यांचा उन्नाव बलात्कार प्रकरणावर वक्तव्य करणारा व्हिडिओ शेअर केला आहे. 'ये घटिया आदमी पुराना पापी है' असे सांगत यांच्यावर कडक टिका केली आहे. BJP MLA Surendra Singh: मुलींवर चांगले संस्कार करा, बलात्कार थांबतील- भाजप आमदार
तर कृति सेनन हिने 'मुलींना बलात्कार कसा होऊ नये हे शिकवा? त्यांना स्वत:ला तरी कळतंय का की ते काय बोलतायत? हीच मानसिकता बदलण्याची गरज आहे. संपूर्ण परिस्थितीच गोंधळलेली आहे. ते त्यांच्या मुलांना संस्कार का देऊ शकत नाहीत?' अशा शब्दांत ट्विटच्या माध्यमातून आपला राग व्यक्त केला आहे.
'जर बलात्कार थांबवायचे असतीलत तर प्रत्येक कुटुंबाची जबाबदारी आहे की, त्यांनी आपल्या मुलींना योग्य संस्कार द्यावेत.गुन्हेगारीला पायबंद घालने हे सरकारचे काम आहे. परंतू केवळ कायदा करुन अथवा गुन्हेगारांना शिक्षा देऊन बलात्कार थांबवता येऊ शकत नाहीत. खरोखरच जर बलात्कार थांबवायचे असतील तर त्यासाठी आई-वडीलांनी आपल्या मुलींना शालीन आणि सुसंस्कारी बनवणे गरजेचे आहे. असे वादग्रस्त वक्तव्य आमदार सुरेंद्र सिंह यांनी केले होते.