Shamita Shetty Undergo Surgery: अभिनेत्री शमिता शेट्टी 'या' धोकादायक आजाराने ग्रस्त, ऑपरेशनपूर्वी शेअर केला व्हिडिओ, पहा

हा व्हिडिओ पाहून चाहते अभिनेत्रीच्या काळीत पडले आहेत. या व्हिडिओमध्ये शमिता शेट्टी हॉस्पिटलच्या बेडवर सर्जरीबद्दल बोलताना दिसत आहे.

Shamita Shetty (PC - Instagram)

Shamita Shetty Undergo Surgery: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty) नुकतीच कुटुंबासह धार्मिक सहलीला गेली होती. शेट्टी कुटुंबीय रविवारी संध्याकाळी मुंबईत परतले. दरम्यान, सोशल मीडियावर सक्रिय असलेली शिल्पा शेट्टीची बहिण शमिता शेट्टी (Shamita Shetty) ने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केला, जो पाहून चाहते थोडे नाराज होत आहेत. हा व्हिडिओ पाहून चाहते अभिनेत्रीच्या काळीत पडले आहेत. या व्हिडिओमध्ये शमिता शेट्टी हॉस्पिटलच्या बेडवर सर्जरीबद्दल बोलताना दिसत आहे.

शिल्पा शेट्टीची बहीण शमिता सध्या आजारी आहे. खुद्द अभिनेत्रीने तिच्या सोशल मीडिया हँडलवरून ही माहिती दिली आहे. अभिनेत्री एंडोमेट्रिओसिस (Endometriosis) ने त्रस्त आहे. यामुळे तिला नुकतेच मुंबईतील रुग्णालयात दाखल करण्यात आले आणि तिच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. (हेही वाचा -Jackie Shroff Moves Delhi HC : जॅकी श्रॉफ यांची उच्च न्यायालयात धाव; नाव, आवाज, फोटोंचा गैरवापर केल्याचा आरोप, विविध संस्थांविरुद्ध खटला दाखल)

शमिताने हा व्हिडीओ तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. व्हिडिओ शेअर करताना, कॅप्शन लिहिले आहे की - 'तुम्हाला माहित आहे की सुमारे 40% महिला एंडोमेट्रिओसिसने ग्रस्त आहेत आणि आपल्यापैकी बहुतेकांना या आजाराबद्दल माहिती नाही. मी माझ्या डॉक्टर, डॉ. नीता वर्टी आणि माझ्या GP, डॉ. सुनीता बॅनर्जी या दोघांचेही आभार मानते. कारण माझ्या वेदनांचे मूळ कारण सापडेपर्यंत त्या थांबले नाहीत. आता माझा आजार थेरपी आणि शस्त्रक्रियेद्वारे काढून टाकण्यात आला आहे, मी चांगले आरोग्य आणि अधिक शारीरिक वेदनामुक्त दिवसांची वाट पाहत आहे!'

पहा व्हिडिओ - 

 

View this post on Instagram

 

A post shared by Shamita Shetty (@shamitashetty_official)

या व्हिडिओमध्ये शमिताचे चाहते ती लवकर बरी होण्यासाठी प्रार्थना करत आहेत. एका यूजरने लिहिले- काळजी घ्या, लवकर बरे व्हा. दुसऱ्या वापरकर्त्याने लिहिले- तुम्हाला चांगले आरोग्य आणि लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा. स्वतःची काळजी घ्या. आणखी एका यूजरने लिहिले आहे की, शमिता स्वतःची काळजी घे, लवकर बरी हो.

शमिता शेट्टीने 2000 साली मोहब्बतें या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. परंतु तिची बहीण शिल्पाप्रमाणे तिला पडद्यावर तिला फार यश आले नाही. काही चित्रपटांनंतर ती मोठ्या पडद्यावरून गायब झाली. यानंतर ती रिॲलिटी शो बिग बॉस सीझन 3 मध्ये स्पर्धक म्हणून दिसली.