सारा अली खान ला वजन कमी करणे पडले महाग; अमेरिका विमानतळावर अधिकाऱ्यांनी न ओळखल्याने ओढवला 'हा' प्रसंग

अभिनेत्री सारा अली खान (Sala Ali Khan) हिने बॉलिवूड मध्ये दमदार एन्ट्री करत अनेकांची मने जिंकली आहेत. तसेच साराचा नुकताच प्रदर्शित झालेला चित्रपट 'लव आज कल' (Love Aaj Kal) यामुळे ती पुन्हा चर्चेत आहे.

Sara Ali Khan (Photo Credits: Instagram)

अभिनेत्री सारा अली खान (Sala Ali Khan) हिने बॉलिवूड मध्ये दमदार एन्ट्री करत अनेकांची मने जिंकली आहेत. तसेच साराचा नुकताच प्रदर्शित झालेला चित्रपट 'लव आज कल' (Love Aaj Kal) यामुळे ती पुन्हा चर्चेत आहे. कार्तिक आर्यन सोबतचा सारा हिचा चित्रपटाला तिच्या चाहत्यांकडून भरघोस प्रतिसाद दिला जात आहे. लव आज कल चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी साराने याचे प्रमोशन सुद्धा जोरदार केले होते. मात्र आता सारा हिला तिच्या वजनामुळे काही वेळेस काही ठिकाणी त्रास सहन करावा लागत असल्याची बाब समोर आली आहे.

प्रमोशन दरम्यान काही मीडिया ग्रुप आणि प्लॅटफॉर्मसोबत बातचीत करताना तिच्या आयुष्यातील काही गोष्टींबाबत खुलासा केला आहे. त्यावेळी तिने असे म्हटले आहे की, अमेरिकाच्या विमानतळावर मला नेहमीच अडवले जाते. कारण माझ्या पासपोर्टवर जुना फोटो म्हणजेच जेव्हा वजन 96 किलो होते त्यावेळचा आहे. पण आता वजन कमी केल्यानंतर अमेरिकाच्या विमानतळावर अधिकाऱ्यांना मला ओळखणे कठीण होते. तसेच वजन कमी केल्यामुळे मी आता एकमद फिट दिसण्यावर कोणाचा विश्वास बसत नाही असे ही तिने म्हटले आहे.('Google वालों, अब तो मेरी उम्र घटा दो', बॉलिवूड अभिनेत्री निना गुप्ता यांनी ट्विटरवर फोटो शेअर करत केली मागणी)

 

View this post on Instagram

 

Presenting Sara ka Sara Sara 💁🏻‍♀️ Let’s make ‘light’ of what it was... Let’s also make it lighter than what it was 🤣😂😅 Video and transformation credit: @namratapurohit 🙌🏻👊🏻🦾🦿

A post shared by Sara Ali Khan (@saraalikhan95) on

तसेच फोटोच नव्हे तर साराचे उपनावामुळे सुद्धा तिला मनस्ताप होतोय. कारण तिच्या स्टुटंड व्हिजावर तिचे नाव सुल्तान असून ट्रॅव्हल व्हिजावर नाव सारा अली खान आहे. त्यामुळे विमानतळावर नेहमीच तिच्या बाबत प्रश्न उभा राहतो. तर याच कारणास्तव मला अमेरिकेत येणे बंद होऊ नये याची सुद्धा चिंता तिने व्यक्त केली आहे.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now