अभिनेत्री Sana Khan ने सुरतमध्ये केले Mufti Anaas शी लग्न; मानवतेची सेवा करण्यासाठी बॉलिवूडला केला होता रामराम (Watch Video)
मानवतेची सेवा करण्यासाठी अभिनेत्रीने बॉलिवूड सोडण्याची घोषणा केली होती.
अभिनेत्री जायरा वसीम नंतर बिग बॉस 6 स्पर्धक आणि बॉलिवूड अभिनेत्री सना खानने (Sana Khan) अभिनय व्यवसायाला रामराम केला होता. मानवतेची सेवा करण्यासाठी अभिनेत्रीने बॉलिवूड सोडण्याची घोषणा केली होती. यानंतर अचानक शनिवारी (21 नोव्हेंबर) अभिनेत्री सना खानने सूरतमध्ये मुफ्ती अनसशी (Mufti Anaas) लग्न केले. सना खानच्या या निर्णयाने सर्वांनाच आश्चर्य वाटले आहे. यापूर्वी शोबीजची दुनिया सोडल्यानंतर सना खानने इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर केली होती. त्यावेळी सना तिच्या मेकअपमुळे ट्रोल झाली होती.
धार्मिक कारणांमुळे मनोरंजन उद्योग सोडणार्या सना खानने काल रात्री मुफ्ती अनसशी लग्न केले. त्यांचे लग्न सुरत येथे झाले. सना खान आणि तिचा नवरा मुफ्ती अनस यांचे दोन व्हिडिओ समोर आले आहेत. व्हिडिओंमध्ये दिसत आहे की, सनाने हिजाबसह पांढर्या भरतकामाचा ड्रेस परिधान केला आहे, तर मुफ्ती अनासने पांढरा कुर्ता पायजामा परिधान केला आहे. सनाच्या लग्नाबद्दल युजर्सनी तिला शुभेच्छा दिल्या आहेत.
याआधी शो बिझनेस सोडताना सना खानने कॅप्शनमध्ये लिहिले होते, 'माझा सर्वात आनंदाचा क्षण. अल्लाह या प्रवासात मला मदत करेल आणि मला मार्ग दाखवेल. तुम्ही सर्व मला तुमच्या प्रार्थनेत ठेवा.’ पुढे सना लिहिते, ‘बंधूनो आणि भगिनींनो... आता मी माझ्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाच्या टप्प्यावर आले आहे. मी अनेक वर्षांपासून चित्रपटसृष्टीत आहे. बर्याच दिवसांत मला सर्व प्रकारची कीर्ती, सन्मान आणि संपत्ती मिळाली. मला हे सर्व माझ्या चाहत्यांकडून मिळाले, ज्याबद्दल मी त्यांची आभारी आहे.’ (हेही वाचा: मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना गायिका कार्तिकी गायकवाडने दिले विवाहासाठी आग्रहाचे निमंत्रण; वर्षा बंगल्यावर झाली भेट)
ती पुढे म्हणते, ‘आज मी जाहीर करते की आजपासून मी चित्रपट उद्योग सोडून मानवतेची सेवा आणि माझ्या निर्मात्याच्या हुकुमावर चालण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करेन.’