Radhika Apte Locked In Airport: ना टॉयलेट...ना प्यायला पाणी...; अभिनेत्री राधिका आपटे विमानतळावर अडकली, पोस्ट शेअर करत व्यक्त केला संताप, Watch Video
एअरलाइन्सच्या कर्मचाऱ्यांनी त्यांना आतून बंद केले.
Radhika Apte Locked In Airport: अभिनेत्री राधिका आपटे (Radhika Apte) ने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करत संताप व्यक्त केला आहे. फ्लाइटला उशीर झाल्यानंतर ती इतर प्रवाशांसह विमानतळाच्या एरोब्रिज (Aerobridge) मध्ये अडकली होती. मात्र, ही घटना कोणत्या एअरलाईनमध्ये घडली हे अभिनेत्रीने सांगितले नाही. 'सेक्रेड गेम्स' अभिनेत्रीने इंस्टाग्रामवर फोटो आणि व्हिडिओ शेअर करत सांगितले आहे की, फ्लाइटला उशीर झाल्यानंतर प्रवाशांना एरोब्रिजमध्ये बसवण्यात आले. एअरलाइन्सच्या कर्मचाऱ्यांनी त्यांना आतून बंद केले.
राधिकाने सांगितले की, 'आज सकाळी 8:30 वाजता माझी फ्लाइट होती. आता 10:50 वाजले आहेत आणि फ्लाइट अजूनही उड्डाणासाठी तयार नाहीये. पण फ्लाइटने सांगितले की आम्ही बोर्डिंग करत आहोत. सर्व प्रवाशांना एरोब्रिजमध्ये चढवण्यात आले आहे. एरोब्रिजला बाहेरून कुलूप लावले. यावेळी प्रवाशांसह लहान मुले, वृद्ध प्रवासी तासाभराहून अधिक काळ आतून बंद होते. सुरक्षा रक्षक दरवाजा उघडत नाहीत. कर्मचार्यांचाही काहीच ठाव-ठिकाणा नाही आहे. (हेही वाचा -'या' फोटोमुळे बॉलिवूड अभिनेत्री राधिका आपटे पुन्हा झाली ट्रोल)
पाणी नाही, टॉयलेटची सोय नाही -
राधिका आपटेने एक क्लिप शेअर केली आहे, ज्यामध्ये ती बंद काचेच्या दरवाजामागे अनेक लोकांसोबत दिसत आहे. काही प्रवासी एरोब्रिजवर सुरक्षा कर्मचाऱ्यांशी बोलताना दिसत आहेत. अभिनेत्रीने सांगितले की, 'एअरलाइन्सने प्रवाशांना सांगितले की ते तिथे आणखी किमान एक तास अडकून राहतील. त्याचा क्रू मेंबर देखील बोर्ड झाला नाही. ते अजूनही नवीन क्रूची वाट पाहत आहेत, परंतु ते कधी येतील हे त्यांना माहित नाही. त्यामुळे ते किती काळ आतमध्ये बंद असतील हे कोणालाच माहीत नाही. मी बाहेरील एका मूर्ख कर्मचारी महिलेशी बोलले, जी कोणतीही अडचण नाही आणि विलंब नाही असे म्हणत राहिली. आता मी आतून बंद आहे आणि त्यांनी आम्हाला सांगितले की आम्ही किमान 12 वाजेपर्यंत येथे असू. आम्ही सर्व बंद आहोत. पाणी नाही, शौचालय नाही. मजेदार सहलीबद्दल धन्यवाद.' (हेही वाचा - 'द वेडिंग गेस्ट' सिनेमातील सेक्स सीन लीक प्रकरणी भडकली राधिका आपटे; पहा काय म्हणाली)
पहा व्हिडिओ -
दरम्यान, राधिका आपटेने शेवटचे 'मेरी ख्रिसमस' चित्रपटात छोटी भूमिका केली होती. सेक्रेड गेम्स, शोर इन द सिटी, बदलापूर, अंधाधुन, पॅडमॅन आणि मांझी - द माउंटन मॅन या चित्रपटांमध्ये तिने तिचे अभिनय कौशल्य सिद्ध केले आहे.