Saroj Khan No More: सरोज खान यांच्या निधनाची बातमी ऐकून अभिनेत्री माधुरी दीक्षित हिला दु:ख झाले अनावर; ट्विटच्या माध्यमातून व्यक्त केल्या भावना

बॉलिवूडमधील आपल्या नृत्य गुरु सरोज खान यांच्या निधनानंतर मााधुरी दीक्षित हिने ट्विटरच्या माध्यमातून एक भावूक पोस्ट केली आहे.

Saroj Khan and Madhuri Dixit (Photo Credits: Instagram)

अभिनेत्री माधुरी दीक्षित (Madhuri Dixit) हिच्या माध्यमातून एकाहून एक हिट गाणी बॉलिवूड इंडस्ट्रीला देणा-या प्रख्यात ज्येष्ठ नृत्यदिग्दर्शिका सरोज खान (Saroj Khan) यांचे आज हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांच्या निधनाची बातमी ऐकून त्यांच्या चाहत्यांवर तसेच संपूर्ण बॉलिवूड जगतावर शोककळा पसरली आहे. बॉलिवूड मधील त्यांची लाडकी शिष्य, त्यांची चाहती अभिनेत्री माधुरी दिक्षित आपल्या गुरु मास्टरजी सरोज खान यांच्या निधनाची बातमी एकून दु:ख अनावर झाले आहे. आपल्या सरोज खान सोबतच्या गोड आठवणींना उजाळा देत त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.

बॉलिवूडमधील आपल्या नृत्य गुरु सरोज खान यांच्या निधनानंतर मााधुरी दीक्षित हिने ट्विटरच्या माध्यमातून एक भावूक पोस्ट केली आहे. RIP Saroj Khan: नृत्यदिग्दर्शिका सरोज खान यांच्या निधनाने रेमो डिसूजा, फराह खान, अक्षय कुमार, जेनेलिया देशमुख यांनी सोशल मिडियाच्या माध्यमातून वाहिली श्रद्धांजली!

"माझ्या प्रिय गुरु सरोज खान जी यांच्या निधनाची बातमी ऐकून मला प्रचंड दु:ख झाले आहे. माझ्यातील नृत्यकौशल्याला उभारी देऊन ते लोकांसमोर आणण्यात सरोजजींचा मोलाचा वाटा आहे. जगाने एक हरहुन्नरी नृत्यदिग्दर्शक गमावला आहे. तुम्ही नेहमी माझ्या स्मरणार राहाल. तुमच्या कुटूंबाला हे दु:ख पचविण्याचे देव बळ देवो" अशी पोस्ट माधुरीने कीली आहे.

Leeladhar Kambli Passes Away: जेष्ठ अभिनेते लीलाधर कांबळी यांचे निधन - Watch Video

माधुरीच्या अनेक हिट गाण्यांचे नृत्यदिग्दर्शन सरोज खान यांनी केले आहे. त्यात तेजाब मधील 'एक दो तीन', बेटा मधील 'धक धक', सैलाब मधील 'हमको आज कल है' तसेच देवदासमधील 'मार डाला' यांसारखी अनेक हिट गाणी केली आहे.