Kimberly Hart-Simpson On Sex Worker: अभिनेत्री किम्बर्ली हार्ट-सिंपसन हिला लोक खरोखरच का समजू लागले सेक्स वर्कर? घ्या जाणून
अभिनेत्री किम्बर्ली हार्ट-सिंपसन (Kimberly Hart-Simpson) या ब्रिटिश अभिनेत्रीने म्हटले आहे की, एका टीव्ही मालिकेत साकारलेल्या एका भूमिकेमुळे लोकांचा भलताच गैरसमज झाला आणि लोक तिला चक्क सेक्स वर्कर (Sex Worker) म्हणजे वेश्या समजू लागले.
अभिनेत्री किम्बर्ली हार्ट-सिंपसन (Kimberly Hart-Simpson) या ब्रिटिश अभिनेत्रीने म्हटले आहे की, एका टीव्ही मालिकेत साकारलेल्या एका भूमिकेमुळे लोकांचा भलताच गैरसमज झाला आणि लोक तिला चक्क सेक्स वर्कर (Sex Worker) म्हणजे वेश्या समजू लागले. या अभिनेत्रीने एका मालिकेत सेक्स वर्करची भूमिका केली होती. त्यानंतर तिच्या चाहते आणि प्रेक्षकांमध्ये भलताच गैरसमज झाला. हा गैरसमज इतका पराकोटीला पोहोचला की, लोकांनी चक्क तिला दर विचारण्यासही सुरुवात केली.
अभिनेत्री किम्बर्ली हार्ट-सिंपसन हिने सांगितलेला हा प्रकार सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. व्हायरल झालेल्या एका व्हिडिओत ती सांगताना दिसते की, तिने 1960 मध्ये प्रसारित झालेल्या Coronation Street या टीव्ही मालिकेत Nicky Wheatley ची भूमिका केली होती. ही मालिका ITV वर प्रदर्शीत झाली होती. (हेही वाचा, Justin Bieber India Show: पाच वर्षांनंतर भारतामध्ये परफॉर्म करणार जस्टिन बीबर; जाणून घ्या कधी आणि कुठे होणार कार्यक्रम)
इन्स्टा फोटो
किम्बर्ली हिने म्हटले की, 10 वर्षे सलग ऑडिशन दिल्यानंतर तिला हा रोल मिळाला. त्या वेळी तिला आपले स्वप्न पूर्ण झाल्यासारखे वाटले. तिने पुढे असेही म्हटले की, सेक्स वर्कर्स तिला संपर्कर करत आणि इतका वास्तववादी अभिनय आणि भूमिका केल्याबद्दल आभार मानत.
इन्स्टा फोटो
किम्बर्ली हार्ट हिने म्हटले आहे की, लोकांनी तर माझी भूमिका आणि जीनन एकत्र केले. अनेक पुरुषांना वाटते की, मी खरोखरच वेश्या आहे. अनेकांनी तर मला थेट संपर्क करुन थेट दरच विचारला. हे म्हटले तर किती भयानक आणि म्हटले तर किती मजेशीर आहे. मी डेटींग अॅप वापरते त्यावर अनेक लोक मला असे भेटतात. मी सरळ त्यांना अनमॅच करते, असेही ती सांगते. ती पुढे सांगते की, मला या गोष्टीचा विशे आनंद वाटतो की, चॅरीटी आणि सेक्स वर्कर्सनी मला संपर्क केला. त्यांनी म्हटले की, निकी हे पात्र तू ज्या पद्धतीने साकारले आहेस ते आम्हाला प्रचंड आवडले. कारण तू खूपच वास्तववादी अभिनय करतेस. महत्त्वाचे म्हणजे लेखकाने हे पात्र ड्रग्ज किंवा ड्रिंक्स यांसह उतरवले नाही.