Ileana D'Cruz Welcomes Second Baby Boy: अभिनेत्री इलियाना डिक्रूझने दुसऱ्यांदा दिला गोंडस मुलाला जन्म; बाळाचा फोटो शेअर करत दिली गुड न्यूज
अनेक बॉलिवूड स्टार्ससह चाहत्यांनी अभिनेत्रीचे दुसऱ्यांदा आई झाल्याबद्दल अभिनंदन केले आहे. या फोटोच्या कॅप्शनमध्ये अभिनेत्री अथिया शेट्टीनेही प्रेमळ अभिनंदन संदेश लिहिला आहे. तथापी, बाळाचे फोटो शेअर करताना इलियानाने लिहिले आहे, 'माझे हृदय खूप भरून आले आहे.'
Ileana D'Cruz Welcomes Second Baby Boy: बॉलिवूड अभिनेत्री इलियाना डिक्रूझ (Ileana D'Cruz) दुसऱ्यांदा आई झाली आहे. तिने तिच्या मुलाची एक झलकही चाहत्यांसोबत शेअर केली आहे. इलियाना डिक्रूझने तिच्या बाळाचा फोटो शेअर करून आपल्या चाहत्यांसोबत ही गोड बातमी शेअर केली आहे. अनेक बॉलिवूड स्टार्ससह चाहत्यांनी अभिनेत्रीचे दुसऱ्यांदा आई झाल्याबद्दल अभिनंदन केले आहे. या फोटोच्या कॅप्शनमध्ये अभिनेत्री अथिया शेट्टीनेही प्रेमळ अभिनंदन संदेश लिहिला आहे. तथापी, बाळाचे फोटो शेअर करताना इलियानाने लिहिले आहे, 'माझे हृदय खूप भरून आले आहे.'
इलियानाने 19 जून रोजी तिच्या दुसऱ्या बाळाला जन्म दिला आहे. आज अभिनेत्रीने बाळाचा फोटो शेअर करत ही बातमी सोशल मीडियावर शेअर केली आहे. प्रियांका चोप्रानेही इलियानाला आई झाल्याबद्दल अभिनंदन केले आहे. इलियानाने तिच्या दुसऱ्या बाळाचे नाव 'कीनू राफे डोलन' (Keanu Rafe Dolan) ठेवले आहे. इलियानाने 2 वर्षांपूर्वी एका खाजगी समारंभात तिचा पती मायकेल डोलनशी लग्न केले होते. इलियानाने तिचे वैयक्तिक आयुष्य खूप खाजगी ठेवले आहे. इलियाना 2023 मध्ये पहिल्यांदा आई झाली. त्यावेळी तिने एका मुलाला जन्म दिला होता. यानंतर, इलियाना आता पुन्हा एकदा आई झाली असून तिने यावेळी एका गोंडस मुलाला जन्म दिला आहे. (हेही वाचा - Shefali Jariwala Death: 15 वर्षांपासून शेफाली जरीवाला 'या' आजाराशी झुंजत देत होती; मुलाखतीत केला 'होता' खुलासा)
इलियाना डिक्रूझने दुसऱ्यांदा दिला गोंडस मुलाला जन्म -
इलियाना डिक्रूझने तिच्या कारकिर्दीत आतापर्यंत 35 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे. इतकेच नाही तर इलियानाने तिच्या कारकिर्दीत अनेक हिट चित्रपट देखील दिले आहेत. 2012 मध्ये आलेल्या 'बर्फी' चित्रपटात इलियानाने प्रियांका चोप्रा आणि रणबीर कपूरसोबतही स्क्रीन शेअर केली आहे. इलियानाने बर्फी चित्रपटातून बॉलिवूडमध्ये तिच्या करिअरची सुरुवात केली. यानंतर, इलियानाने आतापर्यंत 35 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे.