बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतला श्रद्धांजली देण्यासाठी अभिनेत्री भूमी पेडणेकर 550 गरीब कुटुंबाना देणार जेवण

आजही अनेकांना या बातमीवर विश्वास बसत नाही. सुशांतच्या आत्महत्येनंतर बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी खंत व्यक्त केली होती. अशातचं आता बॉलिवूड अभिनेत्री भूमी पेडणेकरने (Bhumi Pednekar) सुशांतच्या आठवणींना उजाळा देत आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर त्याचा फोटो शेअर करून सुशांतला श्रद्धांजली देण्यासाठी 550 गरीब कुटुंबाना जेवण देणार असल्याचं सांगितलं आहे.

Bhumi Pednekar, Sushant Singh Rajput (PC - Facebook)

सुशांत सिंह राजपूतच्या (Sushant Singh Rajput) आत्महत्येनंतर (Suicide) संपूर्ण बॉलिवूडला मोठा धक्का बसला होता. आजही अनेकांना या बातमीवर विश्वास बसत नाही. सुशांतच्या आत्महत्येनंतर बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी खंत व्यक्त केली होती. अशातचं आता बॉलिवूड अभिनेत्री भूमी पेडणेकरने (Bhumi Pednekar) सुशांतच्या आठवणींना उजाळा देत आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर त्याचा फोटो शेअर करून सुशांतला श्रद्धांजली देण्यासाठी 550 गरीब कुटुंबाना जेवण देणार असल्याचं सांगितलं आहे.

दरम्यान, भूमीने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून सुशांतसोबत सोनचिरिया चित्रपटाच्या शुटिंग दरम्यानचा फोटो शेअर केला आहे. भूमीने सुशांतला श्रद्धांजली वाहण्यासाठी दिग्दर्शक अभिषेक कपूर यांची पत्नी प्रज्ञाच्या फाऊंडेशनसोबत 550 गरिब कुटुंबांना जेवण देणार असल्याचं सांगितलं आहे. यासंदर्भात माहिती देताना भूमीने सांगितलं की, 'माझ्या लाडक्या मित्राच्या स्मरणार्थ एक साथ फाऊंडेशनसोबत 550 वंचित कुटुंबांना अन्न पुरवण्याची मी काम करते आहे. प्रत्येक गरजूला प्रेमाने मदत करूया. आता खरचं तशी वेळ आली आहे, असंही भूमीने आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. (हेही वाचा - आलिया भट आणि संजय दत्त चा 'सडक 2' चित्रपट OTT प्लॅटफॉर्मवर होणार रिलीज; ट्विटरवर युजर्स करतायत #BoycottSadak2 ला ट्रेंड)

 

View this post on Instagram

 

🙏 . . . @eksaathfoundation

A post shared by Bhumi✨ (@bhumipednekar) on

 

View this post on Instagram

 

Rest in Peace my friend... Shocked and Heartbroken...Still can’t believe it...To star gazing and our endless chats...am going to spot you twinkling bright up there with the rest cause you are and will always be a star my dearest SSR

A post shared by Bhumi✨ (@bhumipednekar) on

सुशांतने 14 जून रोजी वांद्र्याच्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याच्या आत्महत्येमागील कारण अद्याप अस्पष्ट आहे. पोलिसांनी सुशांतच्या आत्महत्येप्रकरणी आतापर्यंत अनेकांचे जवाब नोंदवले आहेत. सुशांतच्या आत्महत्येनंतर त्याच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला होता.