Kangana Ranaut Wants A Drug Test: रणवीर सिंग, रणबीर कपूर, अयान मुखर्जी, विक्की कौशल यांना कोकिनचे व्यसन? अफवांना पूर्णविराम देण्यासाठी कंगना रनौतची सर्वांना ड्रग्ज टेस्ट करण्याची विनंती

सुशांच्या मृत्यूसंदर्भात कंगनाने अनेक ट्वीट करत अनेकांचे लक्ष वेधून घेतले आहे.

सुशांत सिंह राजपूतच्या मृत्युनंतर बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत (Kangana Ranaut) सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव झाल्याचे दिसत आहे. सुशांच्या मृत्यूसंदर्भात कंगनाने अनेक ट्वीट करत अनेकांचे लक्ष वेधून घेतले आहे. तसेच सुशांतच्या मृत्युसाठी तिने दिग्दर्शक करण जोहर, आदित्य चोपडा आणि महेश भट्टला यांच्यासह अनेक चित्रपट माफियांना जबाबदार धरले आहे. मात्र, याप्रकरणात ड्रग्ज संबधित माहिती समोर आली आहे. या संदर्भात कंगना रनौतने नुकतेच एक ट्विट केले आहे. ज्यात बॉलिवूड अभिनेते रणवीर सिंग, विक्की कौशल, आणि आयान मुखर्जी यांना ड्रग्ज टेस्ट करण्यासाठी ब्लड सॅम्पल देण्याची विनंती केली आहे. या ट्विटमध्ये तिने भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही टॅग केले आहे.

नुकताच कंगना रनौतने ड्रग्जबाबत केलेल्या ट्विटनंतर सिनेसृष्टीत एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान, मी रणवीर सिंह, रणबीर कपूर, आयन मुखर्जी आणि विक्की कौशल यांना विनंती करते की, त्यांनी ड्रग्ज टेस्टसाठी आपले ब्लड सॅम्पल द्यावे. आपण सर्वजण कोकिनचे व्यसन करतात, अशी अफवा सर्वत्र पसरली आहे. या अफवांना कायमचा पूर्णविराम लावण्यात यावा, अशी माझी इच्छा आहे, अशा आशायाचे कंगनाने ट्वीट केले आहे. हे देखील वाचा-C U Soon Full Movie Leaked on TamilRockers & Telegram for Free Download: मल्याळम चित्रपट 'सी यू सून’ ला ऑनलाईन पायरसीचा धोका? तामिळ रॉकर्स, टेलीग्रामवर झाला लीक

कंगना रनौत यांचे ट्वीट-

कंगना रनौत यांनी काही दिवसांपूर्वी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत खुलासा केला होता की, बॉलिवूडमध्ये 99 टक्के लोग ड्रग्जचे सेवन करतात. बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये होणाऱ्या पार्ट्यांमध्ये बिनधास्तपणे ड्रग्ज, गांजा यांसह आमली पदार्थांचे सेवन केले जाते. कंगनाने केलेल्या वक्तव्यावर अद्याप कोणत्याही कलाकारांनी आपली प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र, सोशल मीडियावर अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.