अभिनेता सुशांत सिंह राजपूतचं इन्स्टाग्राम अकाऊंट सुरूच राहणार; कुटुंबीयांनी घेतला महत्त्वाचा निर्णय
14 जून रोजी सुशांतने आपल्या राहत्या घरी आत्महत्या केली होती. सुशांतच्या आत्महत्येनंतर त्याच्या संदर्भातील सर्वच बातम्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत. सध्या त्याच्या चाहत्यांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. सुशांतच्या निधनानंतर त्याचं इन्स्टाग्राम अकाऊंट (Instagram Account) सुरूचं राहणार आहे. यासंदर्भात त्यांच्या कुटुंबियांनी निर्णय घेतला आहे.
बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या (Sushant Singh Rajput) निधनाची बातमी ऐकल्यानंतर संपूर्ण चित्रपटसृष्टीला मोठा धक्का बसला होता. 14 जून रोजी सुशांतने आपल्या राहत्या घरी आत्महत्या केली होती. सुशांतच्या आत्महत्येनंतर त्याच्या संदर्भातील सर्वच बातम्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत. सध्या त्याच्या चाहत्यांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. सुशांतच्या निधनानंतर त्याचं इन्स्टाग्राम अकाऊंट (Instagram Account) सुरूचं राहणार आहे. यासंदर्भात त्यांच्या कुटुंबियांनी निर्णय घेतला आहे.
सुशांतच्या निधनानंतर त्याच्या इन्स्टाग्रामवरील चाहत्यांमध्ये वाढ झाली आहे. इन्स्टाग्रामवरील अनेक युजर्स सुशांतला फॉलो करत आहेत. सुशांतचा चाहता वर्ग लक्षात घेऊन त्यांच्या कुटुंबियांनी त्याचं इन्स्टाग्राम अकाऊंट यापुढेही चालू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे सुशांच्या चाहत्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. (हेही वाचा - Naked Film Release: दिग्दर्शक राम गोपाल वर्मा चा बोल्ड चित्रपट 'नेकेड' आज होणार प्रदर्शित; येथे पाहू शकता पूर्ण सिनेमा)
विशेष म्हणजे सुशांतचे कुटुंबिय त्याच्या नावाने एका फाऊंडेशनची स्थापनादेखील करणार आहे. यासंदर्भात सुशांतच्या कुटुंबियांनी माहिती देताना सांगितलं आहे की, 'तुमच्यासाठी सुशांत सिंह राजपूत आणि आमच्यासाठी आमचा एकुलता एक मुलगा. मोकळ्या मनाचा, बडबडा आणि हुशार. मोठ-मोठी स्वप्न पाहणं आणि ती पूर्ण करण्याची हौस. सुशांतजवळ कायम एक दुर्बणी असायची. त्याला शनि ग्रह पाहण्याची फार आवड होती. आता त्याचं खळखळून हसणं पुन्हा कधीचं आमच्या कानावर पडणार नाही. हे समजण्यासाठी आम्हाला कित्येक वर्ष लागतील. विज्ञानाविषयी प्रत्येक गोष्ट सांगण्याची त्याची धडपड, उत्सुकता आता परत कधीच आम्हाला पाहायला मिळणार नाही, असंही सुशांतच्या कुटुंबियांनी म्हटलं आहे.
सुशांतच्या आपल्या चाहत्यावर खूप प्रेम होतं. तुम्ही त्याच्यावर केलेल्या प्रेमाबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. आता सुशांत आपल्यासोबत नाही. त्यामुळे त्याच्या आठवणी जतन करण्यासाठी आम्ही सुशांत सिंह राजपूत फाऊंडेशनची स्थापना करणार आहोत. या फाऊंडेशनच्या अंतर्गत आम्ही त्याला आवडत असलेल्या कलाविश्व, विज्ञान, आणि क्रीडा या क्षेत्रांमध्ये करिअर करणाऱ्या गरजुंना मदत करणार आहोत.
सुशांतच्या पाटणामधील त्याच्या घरात सुशांतचं स्मारक उभारण्यात येणार आहे. त्यात सुशांतची आवडती पुस्तके, दुर्बिणी, फ्लाइट सिम्युलेटर, गिटार, फर्निचर यांसारख्या गोष्टींचा समावेश असणार आहे. सुशांतच्या उत्तम अभिनयामुळे त्याचे लाखो चाहते होते. त्यामुळे सुशांत आणि त्यांच्या चाहत्यांमधील प्रेम असंच कायम ठेवण्यासाठी आम्ही त्याचं इन्स्टाग्राम, ट्विटर अकाऊंटदेखील लिगेसी अकाऊंटप्रमाणे सुरु ठेवणार आहोत, असंही सुशांतच्या कुटुंबियांनी स्पष्ट केलं आहे.