Naked Film Release: दिग्दर्शक राम गोपाल वर्मा चा बोल्ड चित्रपट 'नेकेड' आज होणार प्रदर्शित; येथे पाहू शकता पूर्ण सिनेमा
Naked Movie (Photo Credits: Instagram)

Ram Gopal Varma's Naked Full Movie: बॉलिवूडमध्ये एकाहून एक सरस भयपट देणारे दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांचा  (Ram Gopal Varma) 'नेकेड' (Naked) हा चित्रपट आज डिजिटल प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. लॉकडाऊन मुळे राम गोपाल वर्मा आपले अनेक प्रोजेक्ट्स सोशल मिडियाच्या माध्यमातून प्रदर्शित करत आहेत. त्यातीलच नेकेड हा चित्रपट आज रात्री 9 वाजता ऑनलाईन माध्यमातून रिलीज केला जाईल. हा एक इरोटिक क्राईम थ्रिलर चित्रपट आहे. हा चित्रपट राम गोपाल वर्मा आपल्या बेवसाइट आणि एका खाजगी व्हिडिओ व्युविंग अॅपवर प्रदर्शित करतील. त्यासाठी प्रेक्षकांना ऑनलाईन पेमेंट करावे लागेल. त्यानंतर ते हा चित्रपट पाहू शकतील.

राम गोपाल वर्मा यांनी ट्विटरवर याबाबत माहिती देत सांगितले की, "22 मिनिटांच्या इरोटिक थ्रिलर चित्रपट 'नेकेड' आज (27 जून) रात्री 9 वाजता http://RGVWorld.in/ShreyasET , http://Rgvworld.the-ally.com वर प्रदर्शित होईल आणि 9.30 वाजता http://Vimeo.com/RGVWorldTheatre वर प्रदर्शित होईल.

हा चित्रपट पाहण्यासाठी प्रत्येक वेळेस तुम्हाला 200 रुपये मोजावे लागतील. Climax Full HD Movie Leaked on Tamilrockers: XXX स्टार मिया मालकोवा ची 'क्लायमेक्स' चित्रपट ऑनलाईन लीक

पाहा नेकेड चित्रपटाचा ट्रेलर

या ट्रेलरला इंटरनेटवर एका आठवड्यात 7 लाख 20 हजारांहून अधिक व्हयूज मिळाले आहेत. यावरुन कयास बांधला जात आहे की, या चित्रपटाला अनेक लोक पाहतील. काही दिवसांपूर्वी राम गोपाल वर्मा यांचा प्रदर्शित झालेला पोर्नस्टार मिया मालकोवाचा 'क्लायमेक्स' हा चित्रपट देखील खूप चर्चेत होता.