Isha Koppikar: ईशा कोप्पीकरला अभिनेत्याने एकटीला भेटण्याची ऑफर दिली, नकार दिल्याने चित्रपटातून बाहेर, अभिनेत्रीचा खुलासा
ईशा कोप्पीकर पुन्हा एकदा अभिनयाच्या दुनियेत परतण्याच्या तयारीत असल्याचे वृत्त आहे. तिच्या बॉलिवूडमध्ये पुनरागमन करण्यापूर्वी, ईशा कोप्पीकरने चित्रपटांपासून दूर का राहिली याबद्दल उघड केले आणि नेपोटिज्म वर भाष्य केले.
ईशा कोप्पीकरने (Isha Koppikar) बॉलिवूडमधील (Bollywood) अनेक उत्तमोत्तम चित्रपटांमध्ये काम केले आहे. ईशा कोप्पीकरने साऊथ सिनेमातून (South Movie) अभिनयात पदार्पण केले. त्यानंतर त्यांनी बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवले. ईशा कोप्पीकरने अनेक मोठ्या कलाकारांसोबत काम केले आहे, जरी ती तिच्या आयटम नंबर 'खल्लास'साठी प्रेक्षकांमध्ये प्रसिद्ध आहे. ईशा कोप्पीकर बऱ्याच काळापासून बॉलिवूड पासून दूर असली तरी लोक तिला 'खल्लास गर्ल' या नावाने म्हणतात. ईशा कोप्पीकर पुन्हा एकदा अभिनयाच्या दुनियेत परतण्याच्या तयारीत असल्याचे वृत्त आहे. तिच्या बॉलिवूडमध्ये पुनरागमन करण्यापूर्वी, ईशा कोप्पीकरने चित्रपटांपासून दूर का राहिली याबद्दल उघड केले आणि नेपोटिझम वर भाष्य केले.
अनेक बॉलिवूड चित्रपटांमध्ये केले काम
विशेष म्हणजे, आता सात वर्षांची असलेली मुलगी रियाना हिच्यामुळे ईशा कोप्पीकरने बॉलिवूडपासून दूर ठेवल्याचा अंदाज लावला जात होता, मात्र अभिनेत्रीने हे अटकळ फेटाळून लावले. आणि चित्रपटांपासून दूर राहण्याचे खरे कारण सांगितले. ईशाने टिमी नारंगसोबत लग्न केले आहे. चित्रपटांव्यतिरिक्त ईशा कोप्पीकर तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत असते. ईशा कोप्पीकरने 'फिजा', 'डरना मना है, कयामत, दिल का रिश्ता, पिंजर, मैने प्यार क्यूं किया, डॉन आणि कृष्णा कॉटेजसह अनेक बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम केले. (हे ही वाचा 100 Crore Club: वालीमाई आणि भीमला नायक 100 कोटी क्लबच्या दिशेने वाटचाल, आलियाचा गंगूबाईच्या शर्यतीत मागे)
माझ्या या वृत्तीमुळे मी बरेच प्रोजेक्टस गमावले
तिच्या व्यक्तिमत्त्वाबद्दल बोलताना ईशाने एका मुलाखतीत सांगितले की, “मी जशी आहे तशीच राहते आणि व्यक्त होते. बरेच वेळा लोक आपला चुकीचा अर्थ लावतात. मी माझ्या कामासाठी येथे आहे. जर मला कोणी आवडलं तर मी त्यांच्याशी बोलेन, पण जर कोणी माझ्याशी वाईट वर्तन केले तर मात्र मला विचार करावा लागेल. माझ्या या वृत्तीमुळे मी बरेच प्रोजेक्टस गमावले आहेत.”
एकट्याला भेटायला बोलावले
ईशा कोप्पीकरने मुलाखतीदरम्यान बॉलिवूडमधील कास्टिंग काउच आणि नेपोटिझमबद्दलचे तिचे अनुभव शेअर केले. यादरम्यान तिने खुलासा केला की एका चित्रपटाच्या निर्मात्याने तिला तिला एकटे भेटण्यासाठी कसे बोलावले आणि अभिनेत्रीने तिची ऑफर नाकारली आणि त्यानंतर ती चित्रपटातून बाहेर गेली. रिपोर्टनुसार, ईशाने खुलासा केला की, "2000 च्या दशकाच्या मध्यात, मला एका प्रसिद्ध निर्मात्याने बोलावले होते. ज्याने सांगितले होते की तुला नायकांच्या चांगल्या लिस्टमध्ये असणे आवश्यक आहे. त्याचा अर्थ मला कळला नाही. म्हणून, मी नायकाला कॉल केला, ज्याने मला त्याला एकटे भेटण्यास सांगितले. त्या क्षणी, त्याच्यावर बेवफाईचा आरोप केला जात होता, म्हणून त्याने मला स्टाफसोबत नको भेटायला येऊ असे सांगितले. मी निर्मात्याला फोन केला आणि सांगितले की मी माझ्या टॅलेंट आणि लूकमुळे येथे आले आहे आणि जर मला चांगले काम मिळू शकले तर ते खूप बरं होईल. नंतर मला या चित्रपटातून हाकलण्यात आले होते."
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)