कोरोना विषाणूवर मात केल्यानंतर अभिनेता Kartik Aaryan ने खरेदी केली Lamborghini Urus; किंमत फक्त 4.5 कोटी (See Video)

कार्तिक आर्यनने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर आपली नवीन कार लंबोर्गिनी उरुस मॉडेलचा व्हिडिओ पोस्ट करुन चाहत्यांना याची माहिती दिली आहे

Kartik Aaryan New Car (Photo Credit : Instagram)

बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यनने (Kartik Aaryan) नुकतेच कोरोना विषाणूवर यशस्वी मात दिली आहे. सोमवारी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करुन त्याने आपला कोरोना अहवाल नकारात्मक आल्याचे सांगितले. त्यानंतर त्याच संध्याकाळी कार्तिकने एक नवी महागडी गाडी खरेदी केली. कार्तिकने आपल्या नव्या कारसह एक व्हिडिओदेखील शेअर केला आहे. कार्तिकने काळ्या रंगाची जबरदस्त लंबोर्गिनी उरुस (Lamborghini Urus) विकत घेतली आहे. कार्तिकने ही लंबोर्गिनी इटलीमधून मागवली आहे, ज्याची किंमत साडेचार कोटी रुपये आहे.

कार्तिकने ही कार इटलीहून मुंबईला आणण्यासाठी अतिरिक्त 50 लाख रूपये भरले आहेत आणि तीन महिन्यांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर त्याची ड्रिम कार त्याच्या शेजारी उभी आहे. कार्तिक आर्यनने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर आपली नवीन कार लंबोर्गिनी उरुस मॉडेलचा व्हिडिओ पोस्ट करुन चाहत्यांना याची माहिती दिली आहे. हा व्हिडिओ पोस्ट करताना कार्तिकने कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, 'विकत घेतलीच.' त्यानंतर त्याने लिहिले आहे, 'परंतु मी बहुधा महागड्या वस्तूंसाठी बनलेलोच नाही'. चाहत्यांव्यतिरिक्त सेलेब्सही कार्तिकच्या या पोस्टवर अभिनंदनाचा वर्षाव करीत आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by KARTIK AARYAN (@kartikaaryan)

या व्यतिरिक्त, कार्तिककडे बीएमडब्ल्यूची एक कार आहे, जी त्याने 2017 मध्ये खरेदी केली होती आणि अलीकडेच 2019 मध्ये, कार्तिकने त्याच्या आईला मिनी कूपरची एक कार भेट दिली होती. कोरोना पॉझिटिव्ह झाल्यानंतर कार्तिक आर्यनने स्वत: ला वेगळे ठेवले होते. तो आपला मोकळा वेळ सोशल मीडियावर आणि घरीच मालिका पाहण्यात व्यतीत करत होता. काल, कार्तिक आर्यनने सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांना बातमी दिली होती की, आता त्याचा 14 दिवसांचा वनवास संपला आहे. कोरोनाचा अहवाल नकारात्मक आला आहे आणि तो आता कामावर परतत आहे. 22 मार्च रोजी कार्तिक कोरोना पॉझिटिव्ह आढळला होता. (हेही वाचा: मुलीच्या जन्मानंतर दोनच महिन्यात Anushka Sharma ने सुरु केले काम; फिटनेस पाहून बसेल आश्चर्याचा धक्का (See Photo)

वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, कार्तिक आर्यन त्याच्या आगामी 'भूल भुलैया 2' चित्रपटासाठी कियारा अडवाणी आणि तब्बू यांच्यासह शुटींग करत होता.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif